Next
रत्नाई कृषी महाविद्यालयात व्हॅलेंटाइन डे अनोख्या पद्धतीने साजरा
BOI
Monday, February 18, 2019 | 02:27 PM
15 0 0
Share this article:



सोलापूर :
अकलूज (ता. माळशिरस) येथील रत्नाई कृषी महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने व्हॅलेंटाइन दिवस साजरा करण्यात आला. शेतीवरील प्रेम, शेतकरी हा या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू होता. १४ फेब्रुवारीचे औचित्य साधून सेरी इनोव्हेटर रेशीमदूतांनी ‘शेतकरी सन्मान’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘कृषी विकास’चे अजय अधाटे होते.

कृषीतज्ज्ञ अजय अधाटे, शेतकरी कांतिलाल ढोपे, मनोहर जाधव, सुग्रीव देवकर यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले. श्री. अधाटे यांनी ‘शेतकरी आत्मसन्मान’ या विषयावर, देवकर यांनी ‘रेशीम शेती प्रगतीकडे नेहती,’ श्री. जाधव यांनी ‘कमी पाण्यात शेती नियोजन’ यावर, तर कांतिलाल ढोपे यांनी ‘कृषी सल्ला एक कर्तव्य’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. ‘अॅग्रिकॉस अॅग्रो’चे प्रतिनिधी शहाजी घाडगे यांनी अॅग्रिकॉस विद्यार्थ्यांनी शेतीमध्ये कसे पुढे जावे, याचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, युवा कृषी उद्योजक मोरेश्वर कोकरे यांनी कृषिमित्रांना शेतीकडे व्यावसायिक दृष्टीने पाहण्याचे आवाहन केले. 

या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, कर्मचारी, शेतकरी व कृषीमित्र-मैत्रिणी आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळातर्फे संचालित रत्नाई कृषी महाविद्यालयांतर्गत ‘सेरी इनोव्हेटर’तर्फे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, संस्थेचे सचिव, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य, महाविद्यालयाचे समन्वयक व प्राचार्य, तसेच ‘सेरी इनोव्हेटर’चे मार्गदर्शक डॉ. वाय. टी. जाधव यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Balkrishna gramopadhyeGGrmbldhn About 92 Days ago
Asale Karyakram anal
0
0

Select Language
Share Link
 
Search