Next
‘नंदुरबारच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील’
BOI
Tuesday, November 07 | 05:24 PM
15 0 0
Share this story

नंदुरबार : ‘जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील आहोत,’ असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

शहादा येथील श्री सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्यात संगणकीकृत ऊस वजन काटा पूजन कार्यक्रम, गाळप हंगाम शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पाटील, माजी आमदार रामकृष्ण पाटील, कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील, सरकारसाहेब रावल, आत्माराम बागले आदी उपस्थित होते.

रावल म्हणाले, ‘पी. के. अण्णा पाटील यांच्याशी आमचे ऋणानुबंध होते. त्यांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न केले. अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. कारखाना सुरू राहिला, तर अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्यामुळे आमची नेहमीच सहकार्याची भूमिका राहिली आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘नंदुरबार-धुळे जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनांमुळे सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या योजना कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. सुलवाडे-जामफळ उपसा सिंचन योजना केंद्र सरकारच्या निधीतून कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी १० हजार कोटी रुपयांचे, तर शेतकरी कर्जमुक्तीसाठी सुमारे ३० हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले. याशिवाय शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे.’

‘सारंगखेडा येथील यात्रेचे ब्रँडिंग करण्यात येत असून यात्रेची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यात येत आहे. राजस्थानातील पुष्करच्या धर्तीवर या यात्रेची माहिती पर्यटकांना व्हावी म्हणून पर्यटन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी यंदा साडेचार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळून रोजगाराची निर्मिती होणार आहे,’ असेही पालकमंत्री श्री. रावल यांनी नमूद केले.

जलसंपदा मंत्री महाजन म्हणाले, ‘प्रतिकूल परिस्थितीत कारखाना चांगल्या पध्दतीने सुरू आहे. कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचे कौतुक केले पाहिजे. शेतकरी टिकविण्यासाठी कारखाने सुरू राहिले पाहिजेत. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्याचे नियोजन केले. उपसा सिंचन योजनेची कामे लवकरच मार्गी लागतील. पाण्याची बचत करण्यासाठी सूक्ष्म सिंचन, ठिबक सिंचनाचा वापर वाढवावाच लागेल. तसेच ठिबकमुळे उत्पादनातही वाढ होते. शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. तापी-बुराई योजनेच्या कामाला गती दिलेली आहे. शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार अभियान सुरू केले.’

प्रास्ताविक कार्यकारी संचालक पी. आर. पाटील यांनी केले. संचालक मंडळ सदस्य रतिलाल पाटील यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link