Next
शिरोळे यांनी घेतली प्रमोद चौधरी यांची भेट
प्रेस रिलीज
Tuesday, July 03 | 04:14 PM
15 0 0
Share this story

‘संपर्क से समर्थन’ अभियानांतर्गत खासदार अनिल शिरोळे यांनी ज्येष्ठ उद्योगपती ‘प्राज इंडस्ट्री’चे प्रमोद चौधरी यांची भेट घेतली.
पुणे : ‘संपर्क से समर्थन’ या भारतीय जनता पार्टीच्या सध्या सुरू असलेल्या देशव्यापी अभियानांतर्गत खासदार अनिल शिरोळे यांनी ज्येष्ठ उद्योगपती ‘प्राज इंडस्ट्री’चे प्रमोद चौधरी यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत शिरोळे यांनी गेल्या चार वर्षांतील केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी विषद केली. या वेळी नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, सुनील पांडे उपस्थित होते.  

उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता यासह वेगवेगळ्या क्षेत्रात भाजपाने मागील ४८ महिन्यांत राबविलेल्या योजना आणि सध्या सुरू असलेले प्रकल्प यांची माहिती देणारा सविस्तर अहवाल त्यांनी चौधरी यांना भेट दिला. त्यांच्याशी  औद्योगिक क्षेत्रावर सविस्तर चर्चा देखील केली. 

‘संपर्क से समर्थन’ हे अभियान सुरू झाल्यापासून शिरोळे यांनी समाजातील विविध स्तरातील मान्यवर व नागरिकांच्या भेटी घेतल्या आहेत. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link