Next
मनोहर पर्रिकरांना निवडणूक आयोगाची नोटीस
BOI
Thursday, February 02, 2017 | 12:00 AM
15 0 0
Share this article:

आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनोहर पर्रिकरांवर तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘संरक्षण मनोहर पर्रिकरांनी त्यांच्या विधानाने आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन केले आहे,’ असे निवडणूक आयोगाचे सचिव सुमित मुखर्जी यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाने पर्रिकरांविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर निवडणूक आयोगाकडून पर्रिकरांना नोटीस बजावण्यात आली. पर्रिकरांच्याआधी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनादेखील निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती.
 पर्रिकर यांच्यावर निवडणूक प्रचारादरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून पैसे स्विकारण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. निवडणूक आयोगाने मनोहर पर्रिकरांना तीन फेब्रुवारीपर्यंत नोटिशीला उत्तर देण्यास सांगितले आहे. गोव्यात चार फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search