Next
गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
BOI
Thursday, September 20, 2018 | 04:56 PM
15 0 0
Share this article:

पुणे : गणेशोत्सवातील देखावा आणि डीजे साउंड अशा गोष्टींवर अवाजवी खर्च न करता वाघोली येथील जय गणेश प्रतिष्ठान आणि जय भवानी मित्र मंडळ यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. देशासाठी लढणाऱ्या जखमी सैनिकांसाठी तसेच अपघातात जखमी झालेल्या गरजू रुग्णांसाठी जय गणेश प्रतिष्ठान आणि जय भवानी मित्र मंडळ यांनी एकत्र येत  या रक्तदान शिबिराचे आयोजन केले. 

पुण्यातील गणेश मंडळे नेहमी आपली सामाजिक बांधिलकी जोपासत असतात. या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, ही जाणीव कायम या गणेश मंडळाना असते. अशीच  सामाजिक बांधिलकीची जाणीव या दोन्हीही मंडळांनी जोपासली आहे. दोन्हीही मंडळाच्या जवळपास १०० कार्यकर्त्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी  जपली आहे. रक्तदानात संचयित झालेले रक्त पुण्यातील ‘आर्म्ड  फोर्स मेडिकल कॉलेज’ला देण्यात येणार आहे

(मंडळाचा देखावा आणि रक्तदान शिबिराचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search