Next
क्रीडा विकास मंडळाच्या चेअरमनपदी सुरेश हेमनानी
प्रेस रिलीज
Monday, May 28 | 12:01 PM
15 0 0
Share this story

सुरेश हेमनानीपुणे : आंतरराष्ट्रीय क्रीडा विकास मंडळाधिन असलेल्या भारतीय क्रीडा विकास मंडळाच्या महाराष्ट्र प्रदेश चेअरमनपदी पुण्यातील उद्योजक सुरेश दयाराम हेमनानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यांतर्गत सर्व खेळांचा प्रसार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ३१ मार्च २०२०पर्यंत त्यांची नियुक्ती असून, सर्व शाळा आणि जिल्हा क्लबमार्फत जिल्हा क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून त्यातून त्यांनी राज्य संघ तयार करणे अपेक्षित आहे. भारतीय क्रीडा विकास मंडळाचे चेअरमन आणि दिल्ली विधानसभेचे माजी सभापती मणिंदर सिंग धीर, अध्यक्ष रवी चाणक्य व जनरल सेक्रेटरी नरेश मलिक यांनी त्यांच्या नियुक्तीचे पत्र दिले आहे.

हेमनानी यांनी भारतीय पुणे सिंधू सभेचे अध्यक्षपद १४ वर्षे भूषविले आहे. सध्या ते भारतीय सिंधू सभेच्या केंद्रीय समितीत उच्चपदस्थ अधिकारी आहे. सिंधी भाषेचा प्रसार आणि सिंधी समाजासाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link