Next
‘गोगटे-जोगळेकर’मध्ये खारफुटी वन संवर्धन कार्यक्रम
BOI
Monday, June 17, 2019 | 03:48 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग ‘मँग्रुुव्ह सोसायटी ऑफ इंडिया’शी संलग्न असून, यामार्फत खारफुटीच्या संरक्षणासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात. याचाच एक भाग म्हणून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाने मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील आचरा या गावातील जामडूलवाडी येथे एकदिवसीय सहलीचे आयोजन केले होते.  

खारफुटीची वने ही खाडी भागात एका विशिष्ट अधिवासात वाढतात. त्यांची प्रजोत्पादनाची प्रक्रिया एका विशिष्ट मुकुलिकेच्या (शेंगेच्या) रूपात पूर्ण होत असते. दर वर्षी एप्रिल ते जून या काळात त्या मुकुलिका परिपक्व होऊन पाण्यात रुजून येतात. खारफुटीची वने हे विविध प्रकारच्या प्राणी, पक्षांचे निवासस्थान आहे. त्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ही वने निसर्गातील जैवविविधतेचे जतन करत आहेत. 

जामडूल वाडी भागातील खाडीच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात खारफुटीची वने आहेत. तेथे स्थायिक असणारे प्रमोद वाडेकर हे निसर्गप्रेमी असून, कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता ते खारफुटीच्या वनांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात. या एक दिवसीय सहलीमध्ये द्वितीय वर्ष विज्ञान शाखेत शिकणारे विद्यार्थी व प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मधुरा मुकादम, प्रा. अंबादास रोडगे, प्रा. मोहिनी बामणे व प्रा. मयुरेश देव सहभागी झाले होते. वाडेकर यांनी सर्व सहभागींना खारफुटीच्या विविध प्रजातींची माहिती व ओळख करून दिली; तसेच त्यांची रोपवाटिका तयार करण्यासाठी मार्गदर्शनही केले. 

या मार्गदर्शनाचा उपयोग करून अशा प्रकारची रोपवाटिका महाविद्यालयाच्या आवारात तयार करण्यासाठी आणि त्या रोपांची लागवड रत्नागिरीच्या खाडी परिसरातील ज्या भागामध्ये खारफुटींची संख्या कमी होत आहे, तेथे करण्यासाठी प्राणीशास्त्र विभाग प्रयत्नशील आहे. या प्रकल्पाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 106 Days ago
It is possible , there are similar sites along the coast . Botany department of some university might become interested .
0
0

Select Language
Share Link
 
Search