Next
मीनाकुमारी
BOI
Wednesday, August 01, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

एक ऑगस्ट २०१८ रोजी गुगलने मीनाकुमारीचे डूडल तयार करून या लोकप्रिय अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली.
सहजसुंदर अभिनयाने आणि संवादफेकीने सिनेरसिकांच्या मनावर राज्य करणारी श्रेष्ठ अभिनेत्री मीनाकुमारी हिचा एक ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये तिचा अल्प परिचय...
......... 
एक ऑगस्ट १९३३ रोजी दादरमध्ये जन्मलेली मीनाकुमारी ही आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि संवादफेकीने सिनेरसिकांच्या मनावर राज्य करणारी श्रेष्ठ अभिनेत्री! बालकलाकार म्हणून बेबी मेहेजबीन आणि बेबी मीना अशा नावाने तिने काही भूमिका केल्या होत्या; पण हिरॉइन म्हणून तिचा पहिला गाजलेला सिनेमा होता बैजू बावरा. तिच्या कमालीच्या अभिनय क्षमतेमुळेच, पन्नास आणि साठच्या दशकात आलेल्या बहुतेक नायिकाप्रधान सिनेमांत तिला आवर्जून मुख्य भूमिकेत घेतलं गेलं. भारतीय सोशिक नारीचं मूर्तिमंत सोज्ज्वळ रूप तिच्या रूपाने जगासमोर आलं. दिलीपकुमार, राज कपूर, गुरुदत्त, अशोक कुमार, राजकुमार, राजेंद्रकुमार यांसारख्या मोठ्या हिरोंसमोरही तिच्या वाट्याला कायम सशक्त भूमिका येत गेल्या. प्रदीपकुमार, सुनील दत्त, भारतभूषण, धर्मेंद्र, किशोर कुमार यांसारख्या इतरही अभिनेत्यांना तिच्याबरोबर काम करून यश मिळवण्याची संधी मिळाली. विजय भट्ट (बैजू बावरा), गुरुदत्त (साहिब बीबी और गुलाम), बिमल रॉय (परिणिता, बेनझीर), सोहराब मोदी (यहुदी), देवेंद्र गोयल (चिराग कहाँ रोशनी कहाँ), किशोर साहू (दिल अपना और प्रीत पराई), श्रीधर (दिल एक मंदिर), हृषीकेश मुखर्जी (सांज और सवेरा), किदार शर्मा (चित्रलेखा), कमाल अमरोही (पाकिजा), बी. आर. चोप्रा (एक ही रास्ता), फणी मुजुमदार (बादबान, आरती), एल. व्ही. प्रसाद (शारदा), भीमसिंग (मै चूप रहूँगी) यांसारख्या महत्त्वाच्या निर्माते-दिग्दर्शकांनी तिला आवर्जून मुख्य भूमिका दिल्या. त्यांचं तिने अर्थातच सोनं केलं. अजीब दास्तां है ये, कोई प्यार की देखे जादुगरी, ओ रात के मुसाफिर, यूँ ही कोई मिल गया था, ना जाओ सैया, हम इंतजार करेंगे, दुनिया करे सवाल तो हम, हम तेरे प्यार मे सारा आलम, रुक जा रात ठहर जा रे चंदा, ज्योती कलश छलकेदिल जो न केह सका, संसार से भागे फिरते हो यांसारखी तिची अनेक गाणी आजही लोकांच्या कानांत रुंजी घालत असतात. फुटपाथ, आझाद, हलाकू, मिस मेरी, सट्टा बाजार, शरारत, चार दिल चार राहें, अकेली मत जईयो, पूर्णिमा, मेरे अपने, दुश्मन यांसारखे तिचे अनेक सिनेमे प्रसिद्ध आहेत. मीनाकुमारीचा आणखी एक जबरदस्त पैलू म्हणजे ती अप्रतिम शायरी करायची. ‘नाझ’या टोपणनावाने तिने अनेक उत्तम नज्म़ लिहिल्या आहेत. ‘आगाज़ तो होता है अंजाम नहीं होता, जब मेरी कहानी में वो नाम नहीं होता’, ‘हंसी थमी इन आँखों मे यूं नमी की तरह, चमक उठे है अंधेरे भी रोशनी की तरह’, ‘कही कही कोई तारा कही कही कोई जुगनू, जो मेरी रात थी वो आपका सवेरा है’ - यांसारख्या तिच्या अनेक गझला लोकप्रिय आहेत. ३१ मार्च १९७२ रोजी तिचा मुंबईत मृत्यू झाला.  (मीनाकुमारीच्या अप्रतिम अभिनयाचा दाखला असलेल्या ‘हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे है’ या गीताचा रसास्वाद वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

यांचाही आज जन्मदिन :
पुण्याबद्दल आपुलकीनं लेखन करणारे अस्सल पुणेकर श्री. ज. जोशी (जन्म : एक ऑगस्ट १९१५, मृत्यू : १३ जानेवारी १९८९)
महाराष्ट्राचे लाडके शाहीर अण्णा भाऊ साठे (जन्म : एक ऑगस्ट १९२०, मृत्यू : १८ जुलै १९६९)
‘मॉबी डिक’ कादंबरीतून माणूस विरुद्ध व्हेल अशा थरारक लढाईचं चित्रण करणारा कादंबरीकार हर्मन मेलव्हील (जन्म : एक ऑगस्ट १८१९, मृत्यू : २८ सप्टेंबर १८९१)
(या सर्वांविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 
‘संदेश’कार अच्युत बळवंत कोल्हटकर

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link