Next
तीन दशलक्ष ट्रॅक्टर्सचे उत्पादन करणारा ‘महिंद्रा’ पहिला भारतीय ब्रँड
प्रेस रिलीज
Thursday, April 04, 2019 | 12:16 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : तीन दशलक्ष ट्रॅक्टर्सची निर्मिती करणारा ‘महिंद्रा’ हा पहिला भारतीय ब्रँड ठरल्याचे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड कंपनीने जाहीर केले. जगातील सर्वांत मोठी शेती ट्रॅक्टर उत्पादक आणि गेल्या तीन दशकांपासून भारतातील आघाडीची उत्पादक असलेल्या ‘महिंद्रा’ने मार्च २०१९मध्ये हा विक्रमी टप्पा पार केला. याचबरोबर कंपनी २०१८-१९मध्ये दोन लाख ट्रॅक्टर्सची निर्मिती केल्यामुळे एकाच आर्थिक वर्षात इतक्या मोठ्या संख्येने ट्रॅक्टर उत्पादन करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.

१९६३मध्ये ‘हार्वेस्टर इंक’ आणि ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ यांच्यातील संयुक्त भागीदारीद्वारे पहिल्या ट्रॅक्टरची निर्मिती केल्यानंतर २००४मध्ये कंपनीने एक दशलक्ष उत्पादनाचा टप्पा गाठला. २००९मध्ये कंपनी जगातील सर्वाधिक शेती ट्रॅक्टरची विक्री करणारी कंपनी ठरली. त्यानंतर ‘महिंद्रा’ विभागाने नऊ वर्षांनंतर २०१३मध्ये दोन दशलक्ष युनिट्सचा टप्पा पार केला व त्यानंतर केवळ सहाच वर्षांत २०१८-१९मध्ये निर्यातीसह पुढील दशलक्षाचा टप्पा गाठत लाखो शेतकऱ्यांचा ब्रँडवर असलेला विश्वास अधोरेखित केला.

तीन दशलक्ष उत्पादनाचा टप्पा सलाजरा करण्यासाठी ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ लवकरच भारतातील ग्राहकांसाठी ‘आपका आभार ३० लाख बार’ हे नवे, सर्वव्यापी अभियान सादर करणार आहे. या अभियानाद्वारे ‘महिंद्रा’ सध्याच्या व नव्या ग्राहकांसाठी खास योजना, सेवा लाभ आणि वित्त योजना जाहीर करणार आहे.

या विक्रमी टप्प्याविषयी ‘महिंद्रा अँड महिंद्रा’च्या शेती उपकरण विभागाचे अध्यक्ष राजेश जेजुरीकर म्हणाले, ‘भारतातील ट्रॅक्टर क्षेत्र आणि महिंद्रा ब्रँड हे समीकरण गेल्या सात दशकांपासून प्रस्थापित आहे आणि तीन दशलक्ष ट्रॅक्टर्सची विक्री ही त्याचीच पावती आहे. इतकी वर्ष आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आम्ही ग्राहकांचे आभारी आहोत. यापुढेही आम्ही नव्या, सहज उपलब्ध होऊ शकणाऱ्या आणि क्रांतीकारी शेती तंत्रज्ञानाद्वारे शेती तंत्र समृद्ध करत राहू आणि नाविन्य व डिजिटायझेशनच्या मदतीने शेतकऱ्यांना शेती उत्पादनांची वाढती मागणी पूर्ण करण्यास मदत करू.’

७०पेक्षा जास्त वर्षे ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ने देशांतर्गत, तसेच सहा खंडांतील एकूण ४० देशांत बहुपयोगी वापर असलेले ट्रॅक्टर विकसित केले असून, भारताबाहेर अमेरिका ही कंपनीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. आज ‘महिंद्रा’चे जगभरात १४ ट्रॅक्टर उत्पादन आणि जुळणी कारखाने कार्यरत आहेत. ग्राहककेंद्री वृत्ती आणि दर्जेदार, परवडणारी उत्पादने तयार करण्यावर भर देणे हे ‘महिंद्रा’च्या यशाचे रहस्य असून, डिझाइनच्या टप्प्यापासून ग्राहकांना नव्या उत्पादनांची चाचणी घेण्यासाठी सहभागी करून घेणे व त्यांना विक्री पश्चात पाठिंबा देण्यापर्यंतच्या कामांचा त्यात सहभाग असतो. आज ‘महिंद्रा’कडे या क्षेत्रातील सर्वोत्तम सर्वसमावेशक ट्रॅक्टर पोर्टफोलिओ असून, त्यात ‘महिंद्रा’च्या महिंद्रा जिवो, महिंद्रा युवो आणि महिंद्रा नोवो या अत्याधुनिक ट्रॅक्टर प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे. ही संपूर्ण उत्पादन श्रेणी शेतकऱ्यांच्या लागवडीसाठी जमीन तयार करण्यापासून कापणीनंतरच्या सर्व गरजांसाठी मदत करते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search