Next
‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर पारितोषिके
प्रेस रिलीज
Friday, April 12, 2019 | 03:12 PM
15 0 0
Share this article:

दुषित पाणी पुरवठा रोखण्यासाठी बनविलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पासमवेत विद्यार्थी व शिक्षक.

इचलकरंजी : येथील ‘डीकेटीई’च्या अंतिम वर्ष इटीसी विभागातील स्वाती शिवलिंगे, निकिता वग्यानी व संध्या चंदुरे या विद्यार्थीनींनी ‘स्मार्ट वॉटर डिस्ट्रीब्युशन अ‍ॅंड क्वॉलिटी मॉनिटरिंग सिस्टीम’ असा नाविन्यपूर्ण प्रकल्प बनविला आहे. या प्रकल्पात यांत्रिकी, परमाणू शास्त्र व सौरऊर्जा या तिन्हींची सांगड घालण्यात आली असून, या प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिके प्राप्त झाली आहेत.

हा समाजोपयोगी प्रकल्प विद्यार्थिनींनी एआयसीटीई, नवी दिल्ली येथे झालेल्या छात्र विश्‍वकर्मा अ‍ॅवॉर्ड प्रकल्प प्रदर्शनामध्ये प्रदर्शित केला असून, हा प्रकल्प लीड कॉलेज शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व प्रा. व्ही. बी. सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली झाला आहे आहे.

वृक्षांची संख्या कमी झाल्यामुळे गेल्या काही वर्षांत भीषण दुष्काळ आणि पाणी टंचाईमुळे जनता त्रस्त झाली आहे, हा विचार करून विद्यार्थिनींनी हा प्रकल्प निवडला. शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटली व लाखो लिटर पाणी वाया गेले, कमी दाबाने पाणी पुरवठा, दुषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा अशा अनेक घटनांचा विचार या प्रकल्पात केला आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटते तेव्हा पाणी पुरवठा अधिकारी व पालिका कर्मचाऱ्यांना लगेच माहिती मिळत नाही. ती मिळेपर्यंत लाखो लिटर पाणी वाया जाते. यासाठी या प्रकल्पात फलो रेट सेन्सर व प्रेशर सेन्सरचा उपयोग केला आहे. जे सतत पाण्याचा प्रवाह व पाण्याचा पाइपमधील प्रेशरची देखरेख करतात.

पाण्याच्या गुणवत्ता चाचणीसाठी प्रकल्पामध्ये पीएच व टर्बिडीटी सेन्सरचादेखील उपयोग केला आहे. यामध्ये छोटया कॉम्प्युटराइज्ड प्रणालीचा वापर केला असून, सर्व सेन्सर्स सतत संदेश पाठवतात. पाइपलाइन फुटली, तर लगेच फलो सेन्सर व प्रेशर सेन्सर कॉम्प्युटराला संदेश पाठवून सावधान करतात; तसेच पाइपलाइनमधून दुषित पाणीपुरवठा होत असेल, त्यावेळी ही पीएच व टर्बिडीटी सेन्सर कॉम्प्युटरला सावधान करतात. नंतर क्षणाचाही विलंब न करता कॉम्प्युटर पाण्याचा होणारा पुरवठा व्हॉल्वद्वारे लगेच बंद करतो, त्यामुळे पाण्याची नासाडी टळू शकते.  
 
हल्ली प्रत्येकाकडेच स्मार्टफोन व इंटरनेट असते. याचा पुरेपूर फायदा विद्यार्थिनींनी या प्रकल्पात केला आहे. या अ‍ॅपद्वारे पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना त्यांच्या मोबाइलवर पाणी विवरण प्रणाली पाहता येणे, विविध प्रभागांमधील, तसेच शहरातील पाणी पुरवठ्याचा तपशील ऑनलाइन पाहता येणे शक्य आहे. एखाद्या ठिकाणी पाण्याचा व्हॉल्व का बंद झाला आहे त्याची कारणे मोबाइलवर पाहता येतील. हा संपूर्ण प्रकल्प सौरऊर्जेवरही चालू शकतो.

संस्थेचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक प्रा. डॉ. यू. जे. पाटील, उपसंचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे व विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. ए. पाटील यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search