Next
रविवारी रंगणार ‘सवाई’त गाणं अन् गाण्यात ‘सवाई’
महाराष्ट्रात प्रथमच शास्त्रीय-सुगम गायनाचा मिलाफ
BOI
Tuesday, August 28, 2018 | 04:36 PM
15 0 0
Share this story

मेघना भावे-देसाई
पुणे : ‘शास्त्रीय संगीत रसिकांसाठी पर्वणी ठरणारा सवाई गंधर्व महोत्सव एकीकडे मर्मबंधातील ठेव असते,तर सुगम गायनातील विविध कार्यक्रमही पुणेकर रसिकांच्या अंतरंगात स्थान मिळवून आहेत. या दोन्हीचे हजारो रसिक प्रेक्षक वेगवेगळे आहेत. शास्त्रीय आणि सुगम गायनाच्या रसिकांना येत्या रविवारी, (२ सप्टेंबर) सकाळी दहा वाजता ‘श्यामरंग’ या कार्यक्रमातून एकत्रित मेजवानी मिळणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य आहे’, अशी माहिती आयोजक व कार्यक्रमाचे निवेदक धनंजय देशपांडे यांनी दिली.

‘नवी पेठेतील पत्रकार संघाच्या कमिन्स सभागृहात ‘सवाई’त गाणं अन् गाण्यात ‘सवाई’ अशा स्वरुपाचा शास्त्रीय आणि सुगम गायनाचा अनोखा मिलाफ ऐकायला मिळणार असून, या दोहोंतील जुगलबंदी पाहता येणार आहे. मुंबईतील प्रसिध्द गायिका मेघना भावे-देसाई सादरीकरण करणार आहेत’, असेही देशपांडे यांनी नमूद केले.
 
देशपांडे पुढे म्हणाले, ‘भारतीय लोकसंगीतावर आधारित शास्त्रीय गायन, बंदिश ऐकतानाच सोबत त्याच रागदारीवर आधारित अजरामर अशी मराठी, हिंदी भावगीते, भक्तीगीते, कबिरांचे दोहे, सिनेमातील गाणी असे एकाच रंगमंचावरुन सादर करण्याचा अनोखा प्रयास डीडी क्लबने केला आहे. शास्त्रीय संगीत व सुगम संगीत दोन्ही श्रवणीयच असतात. त्यामुळे दोन्ही प्रकारातील श्रोत्यांना एकाच मैफिलीत तो आनंद मिळावा, हा या कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश आहे. मुंबईतील प्रसिध्द गायिका मेघना भावे-देसाई या कल्याण येथील गायन समाजच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना शास्त्रीय गायनाचे अध्यापन करीत आहेत. त्या ‘गौरव महाराष्ट्राचा’ शोमधील उपविजेत्या आहेत. साक्षात गानसरस्वती किशोरीताई अमोणकरांचा वरदहस्त लाभलेल्या या गायिकेची अशीच एक फ्युजन मैफिल अंदमानच्या समुद्रकिनारी सादर झाली होती. ज्याला उदंड प्रतिसाद मिळाला होता. आता कृष्णाष्टमीच्या निमित्ताने पुण्यात प्रथमच त्या एक नवीन संकल्पना ‘श्यामरंग’च्या मैफिलीतून घेऊन येत असून, त्यामध्ये बारा प्रहरांचे बारा राग, बंदिश व त्यावर आधारीत अशी प्रसिध्द गाणी सादर करणार आहेत. यामध्ये प्रसिद्ध वादक कलाकारही सहभागी होणार आहेत. प्रशांत पांडव (तबला), निनाद सोलापूरकर (सिंथेसायझर व गायन), उदय शहापूरकर (हार्मोनियम), निलेश देशपांडे (बासरी), नरेंद्र काळे (पर्कशन्स) यांची साथ असणार आहे. रंगमंचावर एकीकडे श्रवणीय गायन ऐकतानाच, दुसरीकडे प्रसिध्द चित्रकार अनिता देशपांडे या पेंटिंगच्या माध्यमातून स्वरांचा मागोवा घेणार आहेत.' 

कार्यक्रमाविषयी 
‘श्यामरंग’ 
स्थळ : पत्रकार संघ, कमिन्स सभागृह, पुणे 
वेळ : रविवार, २ सप्टेंबर, सकाळी दहा वाजता 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dr.Vasant Y.Mahajan About 172 Days ago
A very classik attempt to develope Interest in marathi ABHRUCHI in classical vocal music in current young generation.All the Best to Meghana &her co artists.
0
0

Select Language
Share Link