Next
हृदय दिनानिमित्त वोक्हार्ट हॉस्पिटलतर्फे सर्वेक्षण
प्रेस रिलीज
Saturday, September 29, 2018 | 10:11 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : येथील वोक्हार्ट हॉस्पिटलतर्फे दक्षिण मुंबई, मध्य मुंबई आणि पश्चिम मुंबईतील विविध भागांत एक हजार आरोग्य शिबिरांचे आयोजन केले होते. गेली दोन वर्षे सुरू असलेल्या (२०१६-१८) या उपक्रमात अनेक गृहनिर्माण संस्था, खासगी व कॉर्पोरेट फर्म्स यांचा समावेश होता.

खाण्या-पिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीशी निगडीत इतर घटक हृदयविकारांसाठी कारणीभूत ठरतात. हेच घटक हृदयविकारांना प्रतिबंध करतात आणि विपरित परिस्थिती उद्भवते. जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने वोक्हार्ट हॉस्पिटलने लिपिड प्रोफाइलबाबत एक पाहणी अभ्यास केला. कोलेस्टरॉल आणि हृदयविकार यांच्यातील संबंध तपासणे हा या अभ्यासाचा हेतू होता. या अभ्यासात २०१६ ते २०१८ या कालावधीत एकूण १० हजार ५९५ जणांची लिपिड प्रोफाइल चाचणी करण्यात आली. यामध्ये ६६ टक्के पुरुष, तर ३४ टक्के महिला होत्या. त्यांना हृदयविकाराचा धोका कितपत आहे, हे या तपासणीत शोधण्यात आले. या व्यक्तींपैकी ३० टक्क्यांहून अधिक व्यक्तींमध्ये कोलेस्टरॉलची पातळी अधिक होती. यामध्ये १८ टक्के पुरुष, तर १२ टक्के महिला होत्या. या अभ्यासानुसार ३६-५० या वयोगटातील महिलांना अधिक धोका आहे. म्हणजेच, १८ टक्के महिलांना हा धोका जास्त होता. पुरुषांमध्ये हे प्रमाण १० टक्के होते.

त्याचप्रमाणे पाच हजार २४ व्यक्तींची एलडीएल कॉलेस्टरॉल चाचणी करण्यात आली. ते रक्तवाहिन्यांच्या कडांवर साचते. त्यामुळे गुठळ्या तयार होऊ शकतात. एलडीएलची पातळी जास्त असेल, तर अचानक रक्ताची गुठळी तयार होऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. यात ३२ टक्के महिलांची तपासणी करण्यात आली होती, त्यांच्यापैकी २१ टक्के महिलांमध्ये एलडीएलची कोलेस्टरॉलची पातळी जास्त होती.

अजून एक निरीक्षण असे की, एचडीएल कोलेस्टरॉलची पातळी सामान्य प्रमाणापेक्षा कमी असणे म्हणजेच या विभागात तपासणी करण्यात आलेल्या पाच हजार २४ व्यक्तींपैकी ३२ टक्के व्यक्तींमध्ये हे प्रमाण कमी आढळले. यामुळेही हृदयविकार होण्याची शक्यता वाढते. ३१ टक्के महिलांची एचडीएल कोलेस्टरॉल पातळी तपासण्यात आली आणि याचा निष्कर्ष धोक्याची घंटा वाजविणारा होता. १२ टक्के महिलांमध्ये या कारणामुळे हृदयविकार होण्याची शक्यता अधिक आहे. उपयुक्त कोलेस्टरॉल आणि घातक कोलेस्टरॉल यांच्यातील गुणोत्तर प्रमाण अनुकूल नसेल, तर स्ट्रोकची, हृदयविकाराचा धक्का आणि पेरिफेरल व्हास्क्युलर डिसीजची (रक्ताभिसरणाचा आजार) शक्यता अधिक असते.

पाच हजार व्यक्तींच्या ट्रायग्लिसराइड्स तपासणीमधून अजून एक महत्त्वाचा निष्कर्ष मिळाला. ही तपासणी केलेल्या ३९ टक्के महिलांपैकी १० टक्के महिलांमध्ये ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण सामान्य पातळीपेक्षा अधिक दिसून आले. तेलकट खाणे, व्यायामाचा अभाव, पदार्थांमध्ये हलक्या दर्जाच्या तेलाचा वापर आदींमुळे ही परिस्थिती उद्भवते आणि बहुतांश भारतीय घरांमध्ये अशीच परिस्थिती असते. त्यामुळेच या घटकाकडे बारकाईने लक्ष देणे आणि त्याची नीट काळजी घेणे आवश्यक ठरते.

यासंदर्भात दक्षिण मुंबईतील वोक्हार्ट हॉस्पिटलमधील सल्लागार हृदयविकारतज्ज्ञ डॉ. प्रतीक सोनी म्हणाले, ‘हृदयाच्या रक्तवाहिनीचा विकार होण्यासाठी आहार, जीवनशैली, पर्यावरणीय घटक कारणीभूत असतात. अतिरिक्त तणाव, व्यायामाचा अभाव आणि चुकीचा आहार हे घटक कोलेस्टरॉलच्या उच्च पातळीपेक्षा हृदयासाठी अधिक घातक असतात.’

मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमधील सल्लागार हृदयविकारतज्ज्ञ डॉ. सौरभ गोएल म्हणाले, ‘भारतीयांमध्ये लिपिड्सचा विशिष्ट प्रकारचा पॅटर्न आढळतो. त्यामुळे त्यांना हृदयविकार होण्याची शक्यता बळावते. नियमित प्रतिबंधात्मक चाचण्या केल्या आणि वैद्यकीय निरीक्षणांतर्गत योग्य उपचार केले, तर हृदयविकाराला प्रतिबंध करता येतो आणि आयुष्याला असलेला धोका टाळता येतो.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search