Next
मुंबई म्हाडाची सूत्रे चव्हाण यांनी स्वीकारली
प्रेस रिलीज
Wednesday, September 05, 2018 | 02:33 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते मधु चव्हाण यांनी चार सप्टेंबरला मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.

मंडळाच्या मुख्यालयात राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता तसेच उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांनी चव्हाण यांचे स्वागत केले. राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी मुंबई म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर चव्हाण यांनी लगेचच औपचारिक स्वागत समारंभ टाळून पदाची सूत्रे स्वीकारली व कामाला सुरुवात केली.

अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली व मुंबई म्हाडातर्फे सध्या चालू असलेल्या सर्व प्रकल्पांची माहिती घेतली. म्हाडाच्या प्रत्येक विभागाच्या कामाचा ते आढावा घेणार असून, त्यासाठी स्वतंत्र बैठकांचे आयोजन करण्यात येईल. पहिली बैठक पाच सप्टेंबर रोजी सकाळी झाली. यात बीडीडी चाळींच्या पुनर्वसनासाठी म्हाडातर्फे चालू असलेल्या कामांविषयी माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर दररोज विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा ते घेतील.

नागरिकांच्या म्हाडाविषयीच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी चव्हाण यांना कार्यालयात भेटता येईल. लवकरच त्यासाठी आठवड्यातील ठराविक दिवस व वेळ जाहीर करण्यात येईल.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search