Next
विधानसभेच्या 40 जागांसाठी आज गोव्यात मतदान!
BOI
Saturday, February 04, 2017 | 12:00 AM
15 0 0
Share this article:

गोव्यासह पंजाबमध्ये आज विधानसभेसाठी मतदान सुरु झालंय. 40 जागांसाठी तब्बल 251 उमेदवार रिंगणात आहेत.  गोव्यात विधानसभेच्या 40 जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली.भाजपसाठी अस्तित्वाची लढाई आहे. सकाळी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आपला मतदानाचा बजावला आहे.
सुभाष वेलिंगकर यांनी भाजपला रामराम ठोकत त्यांचा गोवा सुरक्षा मंच हा नवीन पक्ष तयार केला आहे. त्यामुळं ही निवडणुक सत्ताधारी भाजपसाठी जास्त चुरशीची होणार आहे. दुसरीकडे शिवसेनेनंही गोव्यात आपले उमेदवार उभे केले आहेत. भाजप एकाच वेळी दोन पक्षांना शह देण्याचं मोठं आव्हान असणार आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची केंद्रीय संरक्षणमंत्रीपदी वर्णी लागल्यामुळे गोव्यात यावेळी मतदार कुणाला कौल देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
गोव्यात 2012 साली भाजपचं सरकार सत्तेत आलं होतं. यावेळी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून मनोहर पर्रिकर यांना भाजपनं समोर आणलं होतं. त्यामुळे मोदी आणि पर्रिकरांचा करिश्मा अजूनही कायम आहे का याकडे सर्वांचं लक्ष असेल. या निवडणुकीत भाजप, सेना, राष्ट्रवादी, आप, गोवा फॉरवर्ड, गोवा सुराज, गोवा सुरक्षा मंचाचे उमेदवार रिंगणात उभे आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search