Next
चेटीचंड महोत्सवानिमित्त रथयात्रा
प्रेस रिलीज
Monday, March 19, 2018 | 02:46 PM
15 0 0
Share this story


पुणे : सिंधी नववर्ष आणि भगवान साई झुलेलाल यांच्या एक हजार ६८व्या जयंतीनिमित्त आयोजित चेटीचंड महोत्सवाची सुरुवात रथयात्रेने झाली. भगवान झुलेलाल यांचा जन्मोत्सव चेटीचंड महोत्सव म्हणून साजरा केला जातो. पुण्यातील ‘सिंधू सेवा दला’च्या वतीने १८ मार्च रोजी सायंकाळी ही रथयात्रा काढण्यात आली. 

यात्रेमध्ये सर्वात पुढे भगवान झुलेलाल यांच्या वेशभूषेतील झुलेलाल, त्यामागे त्यांची मूर्ती, सिंधी भजनसंगीत म्हणणाऱ्या महिला आणि प्रसाद असे या रथयात्रेच्या स्वरूप होते. साधारणपणे सहाशे नागरिक यामध्ये सहभागी झाले होते.

भवानी पेठेतल्या पदमजी कंपाउंड येथून या रथयात्रेला सुरुवात झाली. बाबाजान चौक, एमजी रस्ता, अरोरा टॉवर्स, लाल देऊळ अशी ही रथयात्रा मार्गस्थ झाली. सर्वात पुढे वेल्हे तालुक्यातील कोंडगाव येथील ‘श्री शिवाजी मित्र मंडळा’चे ढोल व झांजपथक होते. त्यांचे वादन आणि विविध खेळ यामुळे रस्ता दुमदुमून गेला. वाटेत अनेक ठिकाणी पाणी, नाश्ता व इतर सेवा पुरविण्यात आली. 

सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष दीपक वाधवानी, सचिव सचिन तलरेजा, माजी अध्यक्ष सुरेश जेठवानी, निलेश फेरवानी, विजय दासवानी व सुधीर फेरवानी, विनोद रोहानी यांच्यासह इतर अनेक मान्यवर रथयात्रेत सहभागी झाले होते. शालेय विद्यार्थी आणि महिला वर्गाने मोठ्या उत्साहाने यात सहभाग घेतल्याचे दीपक वाधवानी म्हणाले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link