Next
‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांची ‘भारत फोर्ज’मध्ये निवड
प्रेस रिलीज
Tuesday, June 12 | 12:09 PM
15 0 0
Share this story

‘भारत फोर्ज’ या कंपनीत निवड झालेले ‘डीकेटीई’चे विद्यार्थी.

इचलकरंजी : ‘भारत फोर्ज’ कंपनीने घेतलेल्या कॅंपस इंटरव्ह्यूमध्ये येथील डीकेटीई इन्स्टिट्यूटमधील मॅकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅंड टेलिकम्युनिकेशन या शाखांमध्ये शिकणाऱ्या १४ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. ‘भारत फोर्ज’ ही नामांकित अ‍ॅटोमोबाइल कंम्पोनंट बनविणारी आंतरराष्ट्रीय कंपनी असून, दरवर्षी कंपनीतर्फे कॅंपस इंटरव्हयू घेतले जातात. या निवडीमुळे नामांकित कंपन्यामध्ये प्लेसमेंटमध्ये ‘डीकेटीई’ने पुन्हा एकदा मोठी बाजी मारली आहे.

पुणे येथील भारत फोर्ज लिमिटेड आणि ‘डीकेटीई’ यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत ‘भारत फोर्ज’ दरवर्षी त्यांना आवश्यक असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करतात. याहीवर्षी या स्किमखाली मेकॅनिकल विभागातील दिनेश नाडगौडा, ओमकार विभुते, सागर पाटील, अक्षय पवार, स्वप्नील पाटील, चेतन पाटील, स्वप्नील कुंभार, संदीप करके यांची निवड झाली. इलेक्ट्रॉनिक्स विभागातील ओंकार पवार, योगिता कवडे आणि इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅंड  टेलिकम्युनिकेशनमधून कोमल बडे, अनुप्रिता कुलकर्णी, आकांक्षा रोग्गे, सुरभी मोटे यांची निवड झाली.

या विद्यार्थ्यांची कंपनीमध्ये निवड होण्यासाठी कॉलेजने या विद्यार्थ्यांची सॉफ्टस्कील चाचणी, तसेच त्याबद्दलचे मार्गदर्शन आणि टेक्निकल मुलाखातीसाठी कॉलेजच्या तज्ज्ञ प्राध्यपकांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्र व कंपन्यांमधील आजची गरज आणि आवश्यकता यांची जाणीव करून देण्यासाठी विविध नामांकित कंपन्यातील मान्यवरांची मार्गदर्शन सत्रे आयोजित केली होती. शिक्षण पूर्ण होण्याआधीच भावी जीवनासाठी सुसंधी उपलब्ध झाल्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

या कॅंपससाठी इंजिनीअरिंग विभागाचे टीपीओ प्रा. जी. एस. जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले. डायरेक्टर डॉ. पी. व्ही. कडोले, डे. डायरेक्टर (अ‍ॅडमिन) डॉ. यु .जे. पाटील, डे. डायरेक्टर (अ‍ॅकॅडमिक) डॉ. एल. एस. आडमुठे, विभागप्रमुख मेकॅनिकल डॉ. व्ही. आर. नाईक, विभागप्रमुख इटीसी डॉ. एस. ए. पाटील व सर्व प्राध्यापकांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल ‘डीकेटीई’ संस्थेचे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ. सपना आवाडे व सर्व ट्रस्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link