Next
बँक ऑफ महाराष्ट्रची सिग्ना टीटीके हेल्थ इन्शुरन्सशी भागीदारी
प्रेस रिलीज
Tuesday, October 17 | 11:25 AM
15 0 0
Share this story

बँक ऑफ महाराष्ट्र आणि सिग्ना टीटीके हेल्थ इन्शुरन्समधील भागीदारीबाबत माहिती देण्यासाठी उपस्थित असलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक सी.एस.वर्मा, सिग्ना टीटीके हेल्थ इन्शुरन्सचे एमडी व सीईओ संदीप पटेल,  बँकेचे कार्यकारी संचालक ए.सी.राऊत
पुणे : ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ने आरोग्यविमा सेवा पुरवण्यासाठी, ‘टीटीके हेल्थ इन्शुरन्स’बरोबर भागीदारी केली असून महाराष्ट्र आणि पश्चिम भारतात राबवायच्या विकास योजनांचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. या वेळी सिग्ना टीटीके हेल्थ इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ संदीप पटेल,  बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक ए.सी.राऊत, बँकेचे महाव्यवस्थापक सी.एस.वर्मा उपस्थित होते.

 याबाबत अधिक माहिती देताना संदीप पटेल म्हणाले ‘सिग्ना टीटीके हेल्थ इन्शुरन्सने नेहमीच आरोग्य, स्वास्थ आणि सुरक्षिततेची भावना यासाठी सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आम्ही प्रामुख्याने बँकअॅशुरन्सवर लक्ष केंद्रित केले असून, यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रबरोबर भागीदारी करत पुणे आणि पश्चिम भारतात प्रवेश केला आहे. याद्वारे आम्ही द्वितीय आणि तृतीय दर्जाच्या महाराष्ट्रातील आणि पश्चिम भारतातील शहरांमध्ये लोकांपर्यंत पोचणार आहोत. जानेवारीमध्ये दोन्ही संस्थामध्ये धोरणात्मक बँकअॅशुरन्स भागीदारी झाल्यानंतर वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच ‘सिग्ना टीटीके’ने सात हजार ५००  आरोग्य विमा पॉलिसी काढल्या आहेत आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांच्या तब्बल वीस हजार कुटुंबातील सदस्यांना सुरक्षा कवच दिले आहे. आम्ही भारतात ‘गो डिपर’ हे आमचे धोरण राबवणार असून बँकेच्या ग्राहकांना विविध आरोग्यगरजांची पूर्तता करण्यासाठी सेवा उपलब्ध करू; तसेच ‘गो लोकल’ या धोरणाद्वारे ग्राहकांसाठी अनुकूल आरोग्य आणि स्वास्थ उत्पादने तयार करू; ‘गो बियाँड’ या धोरणाद्वारे आमच्या तांत्रिक क्षमतांचा वापर करून आमच्या भागीदारांसाठी वैयक्तिक स्तरावर सेवा यंत्रणा पुरवण्याचेही काम करू’.

 ते पुढे म्हणाले, ‘सिग्ना टीटीके हेल्थ इन्शुरन्स  ही अमेरिकास्थित जागतिक स्तरावरील आरोग्य सेवेतील अग्रणी कंपनी सिग्ना कॉर्पोरेशनची आणि भारतीय समूह टीटीके ग्रूपची संयुक्त कंपनी आहे. विमा क्षेत्रातील दोनशे वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेल्या सिग्ना टीटीकेने भारतात २०१४मध्ये प्रवेश केला  आणि बँक अॅशुरन्सवर लक्ष केंद्रित करून विविध-वितरण माध्यमे तयार केली. सध्या कंपनीचा भारतभरात चार लाख इतका ग्राहकाधार आहे’. 

बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक ए.सी.राऊत म्हणाले, ‘जलद गतीने वाढणारा मध्यमवर्ग आणि तीव्र आजारांची वाढ यामुळे आरोग्यक्षेत्र हे भारतातील सर्वात जलद गतीने वाढणारे क्षेत्र आहे. सिग्ना टीटीकेबरोबरच्या बँकअॅशुरन्स भागीदारीमुळे जागतिकस्तरावरील आरोग्य विमा कंपनी जोडली गेली आहे. यासाठी भारतभरात आमच्या १८९६  शाखांचे विस्तारीत नेटवर्क आणि आमच्या ऑनलाइन बँकसेवांचे व्यासपीठ कार्यरत असेल. आमच्या ग्राहकांना आता आरोग्य विमा उत्पादने आणि सेवा वैयक्तिक गरजेनुसार प्राप्त होतील. सिग्ना टीटीके उत्पादनांमध्ये स्वास्थासंबंधीची वैशिष्ट्येही समाविष्ट आहेत, आणि ती फारच परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. येत्या काही वर्षांत आमचा प्रवास यशाचा होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करू.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link