Next
‘अॅक्सिस बँके’तर्फे ग्राहकांसाठी ‘क्विक पे होम लोन’
प्रेस रिलीज
Thursday, December 13 | 02:32 PM
15 0 0
Share this story

मुंबई : अॅक्सिस बँकेने गृहकर्ज क्षेत्रातील ‘क्विक पे होम लोन’ हे गृहकर्ज दाखल केले असून, या कर्जामुळे ग्राहकांना गृहकर्जावरील व्याजाच्या रकमेमध्ये मोठी बचत करणे शक्य होणार आहे.

या कर्जाच्या परतफेडीसाठी बँक नेहमीची चाकोरी मोडून पर्यायी नियोजन देणार असून, त्यात ग्राहकांना बाकी असलेल्या शिलकीवरील व्याजासह, समान रकमेची मुद्दल फेडता येणार आहे. त्यामुळे, इक्वेटेड प्रिन्सिपल रक्कम व रिड्युसिंग इंटरेस्ट रक्कम यातून रिड्युसिंग मंथली इन्स्टॉलमेंट्स तयार होणार असून, कर्जाच्या संपूर्ण कालावधी भराव्या लागणाऱ्या एकूण व्याजाच्या रकमेमध्ये घट होणार आहे.

ग्राहक दर महिन्याच्या हप्त्याऐवजी (ईएमआय) रिड्युसिंग मंथली इन्स्टॉलमेंट्स भरणार आहेत. यात सुरुवातीचे हप्ते अधिक असतील; (याच कालावधीच्या, याच कर्जाच्या रकमेवरील ईएमआयपेक्षा) पण कर्जाच्या संपूर्ण कालावधीदरम्यान हप्त्याची रक्कम कमी होत जाईल.

यानिमित्त बोलताना अॅक्सिस बँकेचे कार्यकारी संचालक (रिटेल बँकिंग) राजीव आनंद म्हणाले, ‘ग्राहकांच्या फायद्याच्या दृष्टीने आम्ही ‘क्विक पे होम लोन’ हे नाविन्यपूर्ण उत्पादन दाखल केले असून, त्यामुळे ग्राहकांवरील एकंदर व्याजाचा भार कमी होणार आहे. ‘रिड्युसिंग मंथली इन्स्टॉलमेंट्स’ ही विशेष संकल्पना आणि व्याजावर मोठी बचत, यामुळे घर ग्राहकांना निश्चत आकृष्ट केले जाईल.’

‘ही संकल्पना अधिक स्पष्ट करण्यासाठी ५० लाख रुपयांच्या २० वर्षे कालावधीच्या व वार्षिक व्याजदर ९ टक्के असणाऱ्या एका गृहकर्जाचे उदाहरण घेऊ. ग्राहकांना या कर्जासाठी २० वर्षांमध्ये एकूण ५७.९६ लाख रुपये व्याज भरावे लागेल; परंतु अॅक्सिस बँकेच्या ‘क्विक पे होम लोन’साठी ५० लाखांच्या याच कालावधीच्या ९.२० टक्के इतका अधिक व्याजदर असणाऱ्या कर्जासाठी केवळ ४६.१९ लाख व्याज भरावे लागेल. यात ग्राहकांना ११.७७ लाख वाचवता येतील,’ असे आनंद यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link