Next
माढा लोकसभा मतदारसंघात ५६ टक्के मतदान
सोलापुरात ११० वर्षांच्या आजींचे मतदान
BOI
Wednesday, April 24, 2019 | 02:25 PM
15 0 0
Share this article:

सोलापूरमध्ये मतदानासाठी केंद्रावर रांगेत उभे असलेले मतदार

सोलापूर : लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यात २३ एप्रिल २०१९ रोजी झालेल्या निवडणुकीत माढा मतदारसंघात ५६ टक्के मतदान झाले. सोनाबाई मोतीराम खरे या ११० वर्षे वयाच्या ज्येष्ठ महिला मतदाराने मतदानाचा हक्क बजावला. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांनी स्वतः माढा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने, तसेच इथे कोणत्या उमेदवाराची वर्णी लागणार, यांमुळे माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक देशात चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर ‘राष्ट्रवादी’कडून संजय शिंदे यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. ‘भाजप’चे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर आणि शिंदे यांच्यात खरी लढत असून, या निवडणुकीत कोण आघाडी घेणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.

सोनाबाई मोतीराम खरे या ११० वर्षांच्या आजींनी मतदान केले.माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील रोपळे (ता. पंढरपूर) येथे ७२ .८२ टक्के मतदान झाले. मतदान करण्यासाठी जनजागृती झाल्यामुळे मतदारांमध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. आज सोलापुरात ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. या उन्हाचा त्रास सहन करत अनेक मतदार घराबाहेर पडले. काही मतदारांनी उन्हाच्या अगोदर मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर गर्दी केली. त्यानंतर दुपारी  १२ ते दुपारी दोन या वेळेत मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी पाहायला मिळाली. 

एकूण चार हजार ७१० मतदारांपैकी तीन हजार ४३० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदारांमध्ये जनजागृती झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीत या भागात यंदा पहिल्यांदाच ७० टक्क्यांवर मतदान झाले. हा वाढलेला टक्का कोणाच्या पारड्यात पडणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search