Next
ओला ऑटो रिक्षांमध्येही ‘वायफाय’ सुविधा
प्रेस रिलीज
Monday, October 30 | 05:31 PM
15 0 0
Share this story

बंगळुरू : आता ऑटो रिक्षातही वाय फाय सुविधा मिळणार असून ओलाने ‘ऑटो कनेक्ट वायफाय’ सेवा आणली आहे. या सेवेत अमर्यादित वायफाय इंटरनेट कनेक्टिव्हिटी दिल्यामुळे या सेवेची मागणी आणखी वाढणार आहे, यातील दरांमध्ये पारदर्शकता येणार आहे, कॅशलेस देयके देणे शक्य होणार आहे, तसेच प्रत्येकी पिकअप आणि ड्रॉप शक्य होणार आहे. जीपीएस ट्रॅकिंग आणि इतर अनेक सेवाही  ग्राहकांना मिळणार आहेत.

कंपनीचे संचालक आणि ऑटो प्रकाराचे प्रमुख सिद्धार्थ अगरवाल म्हणाले, ‘आम्ही प्रवासाचे सर्वात पारंपरिक पर्यायही प्रवाशांसाठी आणि चालक भागीदारांसाठी ऑनलाइन आणले आहेत. ऑटो-कनेक्ट वायफायद्वारे आम्ही तीन चाकी प्रवासाच्या पर्यायात सुधारणा करत आहोत आणि आमच्या ग्राहकांना अधिक चांगला कनेक्टेड अनुभव देत आहोत. आम्ही सादर केलेला ऑटो-कनेक्ट वायफायचा अनुभव प्रशासनाच्या डिजिटल इंडियासारख्या उपक्रमाच्या पायावर आधारित आहे. या प्रकारातील अशा पहिल्यावहिल्या नावीन्यपूर्णतेमुळे, आम्ही प्रवासातला रस्त्यावरून जातानाचा वेळ अधिक सत्कारणी लावण्याचा प्रयत्न केला आहे. प्रमुख प्रकारातील ओला ऑटो कनेक्ट वायफायची अभूतपूर्व लोकप्रियता बघता, आम्ही मिनी, लक्स आणि मायक्रो अशा प्रकारांमध्येही या सेवेचा विस्तार करण्याचा विचार करत आहोत. भारतीय शहरांमध्ये ४० मिनिटांमध्ये इच्छित स्थळी पोचण्याचा पर्याय उपलब्ध करून दिल्यावर, ओलाने प्रवाशांचा घर ते ऑफिस हा रोजचा प्रवास अधिक चांगला व्हावा, यासाठी प्रयत्न केले आहेत.  इतर क्षेत्रातील वायफाय कनेक्ट ओलाबरोबर प्रवास सुरू झाल्यापासून अमर्यादितपणे इंटरनेट सेवा ओला ग्राहकांना देत असतात. पहिल्यांदा केवळ फोनवरून वायफायसाठी अधिकृतीकरण करावे लागते यानंतर ऑटो कनेक्टचा अनुभव अगदी अमर्यादितपणे घेता येतो, अगदी जेव्हा केव्हा तुम्ही ओलाबरोबर प्रवास कराल तेव्हा.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link