Next
‘वुशु’ची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये नोंद
BOI
Thursday, March 08 | 05:14 PM
15 0 0
Share this story

पुणे : महिला दिनानिमित्त पुण्यात एक आगळ्या-वेगळ्या विक्रमाची नोंद करण्यात आली. ‘वुशु इंटरनॅशनल मार्शल आर्ट्स’तर्फे सहा इंच खिळ्यांच्या फळीवर झोपलेल्या मुलींच्या अंगावरील हजार किलोच्या शहाबादी फरशा हातोडयाने फोडण्याचा विक्रम करण्यात आला. पाच मिनिटे चोवीस सेकंदात हा विक्रम करण्यात आला. ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये याची नोंद झाली आहे.

‘वुशु इंटरनॅशनल मार्शल आर्ट्स’चे प्रमुख विक्रम मराठे, वैष्णवी मांडेकर, अस्मिता जोशी यांनी हा विक्रम केला. नेहरु मेमोरियल हॉल येथे हा कार्यक्रम झाला. यामध्ये सर्वात खालच्या फळीवर वैष्णवी झोपली होती. त्यानंतर तिच्या छातीवर दुसरी खिळयांची फळी ठेवण्यात आली आणि वरच्या भागात  अस्मिता झोपली. काही क्षणातच विक्रम मराठे यांनी लोखंडी घणाने सुमारे एक हजार किलोच्या शहाबादी फरश्या फोडल्या. उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे या मुलींच्या धाडसाला दाद देत कौतुक केले. महिला दिनी स्त्रीशक्तीचा परिचय घडवणाऱ्या त्यांच्या या धाडसाची दखल ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’ने घेतली आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link