Next
श्रीधर रानडे
BOI
Sunday, June 24 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘दिवस सुगीचे सुरू जाहले, ओला चारा बैल माजले .. ’या गाजलेल्या कवितेचे कवी श्रीधर बाळकृष्ण रानडे यांचा २४ जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
....... 
२४ जून १८९२ रोजी जन्मलेले श्रीधर बाळकृष्ण रानडे हे कवी आणि बालसाहित्यकार म्हणून ओळखले जातात. ते रविकिरण मंडळाचे सदस्य होते. ‘दिवस सुगीचे सुरू जाहले, ओला चारा बैल माजले; शेतकरी मन प्रफुल्ल झाले - छन खळ खळ छन, ढुम ढुम पट ढुम, लेझीम चाले जोरात ... ’ हे वर्णन करणारी ‘लेझीम’ ही त्यांची सर्वांत प्रसिद्ध कविता! शेतात राब राब राबून सुगीच्या दिवसांत भरपूर धान्य मिळवल्याने खुश झालेल्या शेतकऱ्यांच्या आनंदोत्सवाचं त्यांनी केलेलं खुमासदार वर्णन यात आहे. या कवितेला एक अंगभूत लय आहे आणि त्यामुळे ही कविता म्हणायला मजा येते. पूर्वी ही कविता पाठ्यपुस्तकात असायची.

काळाच्या दाढेतून, महाराष्ट्र रसवंती, गद्यवैभव, दिवाळीची डाली, कुंपणावरून, बोबड कांदा, गोपाळकृष्ण, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

१९८४ साली त्यांचं निधन झालं.
 
(श्रीधर रानडे यांनी लिहिलेले ‘पावसाचे गाणे’ वाचण्यासाठी  येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link