Next
भारतीय विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञानाची भीती
प्रेस रिलीज
Wednesday, March 27, 2019 | 02:30 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : सध्या सगळीकडेच परीक्षांची सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांनी अभ्यासाची कसून तयारी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांचा परीक्षांकडे पाहण्याचा सर्वसाधारण दृष्टिकोन समजावून घेण्यासाठी ‘ब्रेनली’ या जगातील सर्वांत मोठ्या पिअर-टू-पिअर लर्निंग कम्युनिटीने नुकतेच एक सर्व्हेक्षण केले आहे. यातून गणित आणि विज्ञान या दोन विषयांची अधिक भीती विद्यार्थ्यांमध्ये दिसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला; तसेच विद्यार्थ्यांना ताण आणि कामगिरीविषयी भीती वाटणे अशा समस्या परीक्षा काळात सर्रास उद्भवत असल्याचे ही निदर्शनास आले. जवळपास प्रत्येक विद्यार्थी या मन:स्थितीचा सामना करत असतो.

या सर्वेक्षणात मुंबईसह उर्वरीत भारतातील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला. यामधून परीक्षा दरम्यानचे चित्र स्पष्ट व्हायला मदत झाली. ६५ टक्के प्रतिसादकर्ते या दोन विषयांच्या तयारीवर जास्त भर देणार असल्याचे समजले. तर ६४ टक्के जणांच्या मते या विषयातील तयारीत लवकर सुधारणा करणे आवश्यक आहे. गणित तसेच विज्ञान या दोन विषयांतील संकल्पना व्यवस्थित समजावून घेण्यासाठी वेगळ्या पद्धतीची गरज आहे, हे या सर्व्हेक्षणाच्या निरीक्षणात आढळले. इतर विषयांसोबतच या दोन विषयांच्या तयारीसाठी विद्यार्थी काही पद्धतींचा अवलंब करतात असे दिसून आले. पुस्तके आणि नोट्सना सर्वाधिक (६० टक्के) प्रतिसाद मिळाला असला, तरीही ऑनलाइन पर्याय आणि स्त्रोत (३० टक्के), तर उत्तम आकलन आणि अभ्यासासाठी (१० टक्के) प्रतिसाद नोंदवण्यात आला.

प्रतिसादकर्त्यांनी परीक्षेदरम्यान केलेला अभ्यास विसरायला होण्याविषयी सर्वाधिक भीती व्यक्त केली. हेच विद्यार्थी पालक-इतरांच्या अपेक्षांना पात्र ठरण्याव्यतिरिक्त अपयश टाळण्यासाठी, उत्तम कामगिरीसाठी स्वत:च्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत असल्याचे स्पष्ट झाले. परीक्षेच्या ताणापासून मुक्त राहण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये संगीत ऐकण्याला सर्वाधिक पसंती दिसून आली, तर सिनेमा पाहणे, गेम्स खेळणे, वामकुक्षी घेणे आदी पर्यायही विद्यार्थ्यांमध्ये प्रिय असल्याचे आढळले. संपूर्ण भारतातील विद्यार्थी परीक्षाकाळात नेमक्या कशा परिस्थितीतून जातात, उत्तीर्ण होण्यासाठी करण्यात येणारे व्यापक प्रयत्न याचे चित्र सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाले.

‘ब्रेनली’चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी माइकल बोरकोवस्की म्हणाले, ‘ब्रेनलीसाठी भारत ही वेगाने वाढणारी कम्युनिटी आहे. भारतीय विद्यार्थी परीक्षांच्या परिणामांविषयी जागरूक आहेत, ते सातत्याने शिक्षणाचे प्रभावी पर्याय शोधत असतात. मुंबईतील विद्यार्थ्यांना गणिताची सर्वाधिक काळजी वाटते. आमच्या मंचावर ज्या पद्धतीच्या प्रश्नांचा ट्रेंड सुरू असतो त्यामध्ये हे प्रतिबिंब जाणवते. आमच्या ग्लोबल कम्युनिटीच्या मदतीतून यावर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न असून शिक्षक-पालकांनीही सातत्याने या समस्येचे निराकरण करणे आवश्यक ठरते.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search