Next
‘विद्यापीठस्तरावर लोकपाल आणणारे महाराष्ट्र पहिले राज्य’
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रेस रिलीज
Monday, March 04, 2019 | 04:43 PM
15 0 0
Share this article:

विनोद तावडेमुंबई : ‘विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विदयार्थ्यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. हे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने सर्व विद्यापीठांमध्ये समान कार्यपद्धतीची गरज दिसून आली. विद्यापीठ तक्रार निवारणसंदर्भात एकरूप परिनियम तयार करण्यात आला आहे. या परिनियमामुळे महाविद्यालय, तसेच विद्यापीठ स्तरावर तत्काळ निवारण कक्षाची योजना आणि विद्यापीठ स्तरावर अपील करण्यासाठी लोकपाल नियुक्त केला जाणार आहे. विद्यापीठस्तरावर लोकपाल नियुक्त करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे,’ अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दोन मार्च २०१९ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

‘उच्च शिक्षणस्तरावरील विद्यार्थी तक्रार निवारणाची संवैधानिक व्यवस्था विद्यापीठ, तसेच महाविद्यालयस्तरावर आजवर नव्हती; परंतु परिनियम प्रसिद्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या प्रवेशापासून ते परीक्षेच्या निकालापर्यंतच्या विविध तक्रारींचे परिणामकारक निवारण होणार आहे,’ असे तावडे यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या हितासाठी लोकपाल आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरताना विद्यापीठ, महाविद्यालये निवृत्त न्यायाधीश, निवृत्त कुलगुरू तज्ञ यांची नेमणूक लोकपाल म्हणून करू शकतात. या परिनियमाद्वारे तक्रार निवारणाची व्यवस्था विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. तसेच विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना अशी व्यवस्था निर्माण करणे बंधनकारक असणार आहे.  यासंदर्भातील परिनियम आज राज्य शासनाच्या राजपत्रामध्ये प्रकाशित झाला आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search