Next
नागरिकांसाठी मेट्रोतर्फे सहयोग केंद्र
प्रेस रिलीज
Monday, November 27 | 06:05 PM
15 0 0
Share this story

पुणे : पिंपरी – चिंचवड ते स्वारगेट या मेट्रोच्या मार्गिकेबाबत नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी महामेट्रोतर्फे वल्लभनगर एस. टी स्थानकामागे सहयोग केंद्र सुरू करण्यात आले असून, या केंद्राला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
 
मेट्रोसंबंधीच्या विविध विषयांची माहिती घेण्यासाठी नागरिक सहयोग केंद्राला भेट देत असून, मागील दोन आठवड्यात मेट्रोच्या कामाची प्रगती, रोजगार निर्मिती, मुठा नदीपात्रातील काम, पर्यावरण बदल, वाहतूक व्यवस्था आदी विषयांची माहिती घेत आहेत.
 
नागरिकांच्या शंकांची उत्तरे देण्यासाठी महामेट्रोचे चार प्रतिनिधी या केंद्रात सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत कार्यरत असतील. या सहयोग केंद्रात मेट्रोची माहिती पुस्तिका उपलब्ध असून,मेट्रोचे मार्ग, स्थानके, मेट्रोमुळे  नागरिकांना होणारे फायदे आदीची माहिती त्यात उपलब्ध आहे. याशिवाय पर्यावरण संवर्धनासाठी महामेट्रोतर्फे राबविण्यात येत असलेले हरित उपक्रम, अपघातात होणारी घट, प्रदूषणाचे कमी होणारे परिणाम, स्थानिकांना मिळणारा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार, प्रवासाचा कमी होणारा वेळ अशा प्रकारची माहिती नागरिकांना दिली जात आहे.
 
याचबरोबर पुणे मेट्रो सामाजिक माध्यमांवर देखील सक्रीय असून, पुणे मेट्रो वेबसाईट, फेसबुक पेज, ट्विटर , यू-ट्यूब  यावर प्रकल्पाची होणारी प्रगती आणि आवश्यक माहिती देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय १८००२७०५५०१  या टोल फ्री क्रमांकावर देखील संपर्क करून नागरिकांना मेट्रोबद्दलची माहिती घेता येणार आहे.  नागरिकांना आपल्या सूचना , माहिती आणि तक्रारी यादेखील या सहयोग केंद्रात मांडता येणार आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link