Next
डॉ. प्रकाश कदम यांना पशुधन सल्लागार म्हणून मान्यता
BOI
Monday, July 15, 2019 | 04:48 PM
15 0 0
Share this article:

डॉ. प्रकाश कदमसोलापूर : येथील कृषी विज्ञान केंद्रात १५ वर्षे विषय विशेषज्ञ (पशुवैद्यक शास्त्र) म्हणून कार्यरत असणारे डॉ. प्रकाश कदम यांना हैदराबाद येथील राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्थेकडून प्रमाणित पशुधन सल्लागार म्हणून मान्यता देण्यात आली. 

डॉ. कदम यांनी गोवंश मेरठमधील (उत्तर प्रदेश) केंद्रीय अनुसंधान संस्था आणि  राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था (मॅनेज) यांच्या संयुक्त विद्यमाने २०१८-१९ मध्ये एक वर्ष कालावधीचा प्रमाणित पशुधन सल्लागार पदवी अभ्यासक्रम राबविला होता. यात देशपातळीवर निवड पद्धतीने २० जणांना प्रवेश देण्यात आला होता. त्यात डॉ. कदम यांची महाराष्ट्रातून निवड झाली होती. 
 
डॉ. कदम यांनी ‘गाईच्या आहारात खनिज मिश्रणाचा अंतर्भावाचा परिणाम अभ्यासणे’ या विषयावर अभ्यासपूर्ण प्रबंध सादर केला होता. यात त्यांनी प्रथम श्रेणी संपादन करत प्रमाणित पशुधन सल्लागार पदवी प्राप्त केली. हा प्रबंध पूर्ण करण्यासाठी प्रधान शास्त्रज्ञ व प्रमुख गो-अनुवंश व प्रजनन गो-मध्यवर्ती संशोधन संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक तज्ज्ञ म्हणून डॉ. उमेश सिंग लाभले होते; तसेच सोलापूरमधील शबरी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. ला. रा. तांबडे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाले. सोलापूर येथील कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांचेही यात सहकार्य लाभले. 

या यशाबद्‌दल डॉ. कदम यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. डॉ. कदम यांनी नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या कामाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search