Next
भाभा अणु संशोधन केंद्राच्या तेराव्या तुकडीच्या सुवर्ण महोत्सव साजरा
BOI
Tuesday, August 20, 2019 | 05:18 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : देशभरात विविध संशोधनात्मक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भाभा अणुशक्ती संशोधन केंद्रातील तेराव्या तुकडीच्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांनी नुकताच सुवर्ण महोत्सव साजरा केला.  

यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात भारत सरकारचे प्रमुख संशोधन सल्लागार, तसेच अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणु ऊर्जा विभागाचे सचिव डॉ. आर. चिदंबरम्, ‘डीआरएनएस’चे अध्यक्ष डॉ. श्रीकुमार बॅनर्जी यांनी उपस्थित शास्त्रज्ञांना संबोधित केले. 

डॉ. चिदंबरम्
डॉ. चिदंबरम् यांनी नॉलेज नेटवर्किंगचे महत्त्व, पुनरुज्जीवन आणि उत्कृष्टता यांची भूमिका, ‘बार्क’ने अंमलबजावणी केलेल्या आणि इतर संस्थांनी उचललेल्या प्रशिक्षण आणि निवड पद्धतीचे फायदे याबद्दल माहिती दिली. 

डॉ. श्रीकुमार बॅनर्जी यांनी परिणामकारक, दर्जेदार प्रशिक्षणाच्या महत्त्वावर जोर दिला. डॉ. चंद्रचूड यांनी वरिष्ठ शास्त्रज्ञांचे स्वागत करून त्यांनी राष्ट्र विकासामध्ये दिलेल्या योगदानाचे महत्त्व विशद केले.  ए. के. सिंघल यांनी उत्पत्तीचे आणि एकत्रीकरणाचे महत्त्व विशद केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search