Next
‘वालचंद’मध्ये ‘मायक्रोसॉफ्ट’ने दिले सर्वाधिक पॅकेज
प्रेस रिलीज
Wednesday, May 30, 2018 | 05:42 PM
15 0 0
Share this story

सांगली : मायक्रोसॉफ्टने यंदाच्या कॅंपस रिक्रुटमेंटमध्ये येथील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये ३७ लाख रुपये इतके सर्वाधिक पॅकेज देऊ केले आहे. यंदाच्या कॅंपस रिक्रुटमेंटमध्ये सहभागी झालेल्या ७५ कंपन्यांपैकी १६ कंपन्यांनी यावर्षी सात लाखांहून अधिक रुपयांचे पॅकेज दिले आहे आणि ५२ कंपन्यांनी वार्षिक चार लाखांहून अधिक पॅकेज दिले आहे. आतापर्यंत सरासरी ५.०७ लाख रुपये वार्षिक पगार देऊ करण्यात आला आहे.

टीसीएस, इन्फोसिस, आयबीएम, कॅपजेमिनी व विप्रो यांनी वालचंद ग्रॅज्युएड्सची मोठ्या प्रमाणात नियुक्ती केली, तर मायक्रोसॉफ्ट, डायरेक्ट I, बीपीसीएल, सिमेंटेक, व्हेरिटाज, हिंदुस्तान युनिलिव्हर, बार्कलेज, ईएमसी, सिमेन्स, इटॉन कॉर्पोरेशन, जॉन डीअर, थॉटवर्क्स यांनी उत्तम पगाराची पॅकेज दिली.

आतापर्यंत एकूण ३६६ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली आहे. त्यापैकी ३०६ विद्यार्थी अंडरग्रॅज्युएट आहेत व ६० पोस्टग्रॅज्युएट आहेत. लोकप्रिय कंपन्यांमध्ये अंदाजे २१२ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली. येत्या काही दिवसांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळणार आहे, तर काही विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाचा पर्याय निवडला आहे. याबरोबरच, संस्थेने गेल्या सेमिस्टरमध्ये १०७ अंडरग्रॅज्युएट व ९३ पोस्टग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना इंटर्नशिप दिली आहे.

वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगविषयी :
वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगची १९४७ साली स्थापना झाली असून ते भारतातील सर्वात जुन्या अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक आहे. विशेषतः २००७पासून अध्यक्ष अजित गुलाबचंद आणि प्रशासकीय मंडळाच्या इतर प्रतिष्ठित सदस्यांच्या मौल्यवान मार्गदर्शनाखाली स्वायत्त संस्थेची स्थापना झाल्यानंतर महाविद्यालय नव्या रूपाने कार्यरथ झाले.

मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या भारत सरकारच्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) मध्ये २०१८मध्ये १०१-१५०च्या रँक बँडमध्ये WCE विशेष टीक्यूआयपीच्या तिसऱ्या टप्प्यात वालचंद कॉलेजची निवड करण्यात आली आहे. त्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जबलपूरचे मार्गदर्शन करणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link