Next
‘लेक्सस’ची ‘एसयूव्ही एलएक्स ५७०’ भारतात दाखल
प्रेस रिलीज
Monday, May 21 | 05:39 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘दमदार कामगिरी, उत्कृष्ट आराम आणि आधुनिक सौंदर्य यांचा मिलाफ असलेली लेक्ससची ‘एलएक्स ५७०’ ही एसयूव्ही भारतात दाखल झाली असून, २१ मेपासून तिची नोंदणी सुरू झाली आहे. तिची किंमत दोन कोटी३२ लाख ९४ हजार  रुपये (एक्स-शोरूम) आहे’,अशी माहिती लेक्सस इंडियाचे चेअरमन एन. राजा यांनी दिली.  

ते पुढे म्हणाले, ‘फ्लॅगशिप एसयूव्हीला शोभतील असे अनेक नवे मापदंड ‘एलएक्स ५७०’ ने स्थापन केले आहेत. यामध्ये ५.७ लिटरचे  व्ही-एट इंजिन असून, वातावरण नियंत्रणापासून ते श्रेष्ठ दर्जाच्या मनोरंजन प्रणालीपर्यंत सर्व काही या गाडीत आहे.स्पिंडल ग्रिलसारखी लेक्ससची वैशिष्ट्ये समजली जाणारी डिझाइन्स; तसेच लेक्ससचे लक्षवेधी एल आकाराचे चमचमते तिहेरी एलईडी हेडलाइट्स यामुळे ‘एलएक्स ५७०’चे बाह्यरूप देखणे झाले आहे. लेदरने केलेल्या अंतर्गत सजावटीवर ताकुमीची छाप स्पष्ट दिसून येते, तर स्टीअरिंग व्हीलवरील शिमामोकु ट्रिमही लगेच लक्षात येते.’

‘एलएक्स ५७० ही एसयूव्ही ताकद, कामगिरी आणि परिपूर्णता यांचा अनोखा मिलाफ असून भारतीय रस्त्यांवर ही गाडी सर्वांचे लक्ष वेधून घेईल. असमतोल पृष्ठभागाची अनिश्चितता हाताळून लेक्ससच्या आरामदायीपणाचा मापदंड पूर्ण करण्यासाठी ही गाडी तयार करण्यात आली आहे,’ असे  लेक्सस इंडियाचे प्रेसिडेंट पीबी वेणूगोपाल यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link