Next
‘चेटीचंड’ महोत्सवातून सिंधी संस्कृतीचे दर्शन
प्रेस रिलीज
Thursday, March 22 | 04:58 PM
15 0 0
Share this story

पुणे : भगवान साई झुलेलाल यांची आरती... गायक जतीन उदासी यांचे बहारदार गायन... सिंधी गीते... कलात्मक नृत्य... चाट-सामोसा-गोड भात... डोक्यावर लाल टोपी आणि झुलेलाल यांचे अखंड भजन यातून सिंधी समाजाच्या नववर्षाच्या सुरुवातीला सिंधी संस्कृतीचे दर्शन घडले.

भगवान साई झुलेलाल यांच्या एक हजार ६८व्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे ‘चेटीचंड’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अल्पबचत भवनमध्ये झालेल्या या महोत्सवात संगीत, गायन, भजन आणि महाप्रसादातील विविध पदार्थ यामुळे ‘चेटीचंड’ महोत्सव वैशिष्ट्यपूर्ण ठरला.

या वेळी मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया उपस्थित होत्या. महोत्सवात उल्लेखनीय कार्याबद्दल ओय फाउंडेशनच्या संस्थापक सिमरन जेठवानी, क्रिप्स फाउंडेशनचे मनोहर फेरवानी, ईश्वर कृपलानी यांचा सन्मान करण्यात आला. सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष दीपक वाधवानी, सचिव सचिन तलरेजा, माजी अध्यक्ष सुरेश जेठवानी, विनोद रोहानी यांच्यासह पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ४००० पेक्षा अधिक सिंधी बांधव या महोत्सवात सहभागी झाले होते.
 
दीपक वाधवानी म्हणाले, ‘दोन दिवसांच्या चेटीचंड महोत्सवानिमित्त पहिल्या दिवशी भगवान साई झुलेलाल यांची भव्य मिरवणूक व रथयात्रा काढली जाते. दुसऱ्या दिवशी झुलेलाल यांचे विधिवत पूजन करून सांस्कृतिक कार्यक्रम व भजन होते. यंदा जनरेशन नेक्स्ट डान्स अकँडमीतर्फे नृत्यकलेचे सादरीकरण आणि जतिन उदासी व सहकार्‍यांचा लाईव्ह कॉन्सर्ट झाला.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link