Next
व्होडाफोन आणि आयटेल मोबाइल एकत्र
प्रेस रिलीज
Wednesday, December 20 | 03:50 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतातील आघाडीची दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनी व्होडाफोन इंडिया आणि आयटेल मोबाइल या आघाडीच्या मोबाइल कंपनीने धोरणात्मक भागिदारी जाहीर केली असून, त्याअंतर्गंत वैशिष्ट्यपूर्ण, नवा आयटेल ए२० स्मार्टफोन खरेदी करण्यावर कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. आयटेल ए२० खरेदी करणाऱ्या ग्राहकाला दोन हजार १०० रुपयांचा कॅशबॅक मिळणार असून, त्यामुळे मोबाइलची किंमत तीन हजार ६९० रुपयांवरून केवळ एक हजार ५९० रुपयांवर येईल.

देशभरात फोर जीचा प्रचार करण्याच्या समान ध्येयाने आयटेल व व्होडाफोनने ही भागिदारी केली आहे. स्मार्टफोन व मोबाइल इंटरनेट सहजपणे उपलब्ध करून देत डेटा वापरास चालना देणे आणि ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत कायम कनेक्टेड राहाण्याची क्षमता देणे हे या भागिदारीचे उद्दिष्ट आहे.

या भागिदारीचा लाभ घेण्यासाठी आयटेल व व्होडाफोनच्या ग्राहकांना तीन हजार ६९० किंमतीचा आयटेल ए२० स्मार्टफोन खरेदी करून त्यावर १८ महिने दर महा दीडशे  किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. हे रिचार्ज एकत्रितपणे एका वेळेसही करता येऊ शकते. १८ महिने संपल्यानंतर ग्राहकांना ९०० रुपयांचा कॅशबॅक मिळेल. दर महा दीडशे रुपयांचे रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना आणखी १८ महिन्यांनंतर एक हजार २०० रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक मिळेल.

ही एकत्रित ऑफर ३१ मार्च २०१८पर्यंत उपलब्ध आहे. ग्राहकांना त्यांच्या एम-पैसा वॉलेटमध्ये कॅशबॅक मिळणार असून, त्याचा वापर करून त्यांना आपल्या सोयीनुसार रिचार्ज करता येईल, बिले भरता येतील, पैसे पाठवता येतील किंवा पैसे काढता येतील.

ट्रान्सन इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष (मार्केटिंग) गौरव टिक्कू, म्हणाले, ‘आयटेलमध्ये आम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत फोर जी स्मार्ट अनुभव पोहोचवण्यासाठी तसेच आमच्या सर्व उत्पादनांचे मूल्यवर्धन करण्यासाठी बांधील आहोत. हे ध्येय साकारण्यासाठी आम्ही आमचा फोरजी पोर्टफोलिओ विस्तारत असून उत्पादनांद्वारे अधिक चांगले मूल्य देण्यासाठी मोठे धोरणात्मक करारही करत आहोत. व्होडाफोनशी केलेली भागिदारी ही आमची बांधिलकी अधोरेखित करणारी आहे. त्यांचे सर्वोत्तम नेटवर्क वैशिष्ट्यांनी परिपूर्ण ‘ए२०’ ला पूरक ठरेल. ही भागिदारी देशभरात फोर जीचा वापर वाढवेल आणि आयटेल तसेच व्होडाफोनसाठी एकंदर मूल्य विस्तारेल, असा विश्वास आम्हाला वाटतो.’

व्होडाफोन इंडियाचे सहकारी संचालक (ग्राहक व्यवसाय) अवनीश खोसला म्हणाले, ‘भारतातील लाखो ग्राहक मोबाइल इंटरनेच्या फायद्यांचा आनंद घेण्यासाठी स्मार्टफोनकडे वळत आहेत. ग्राहकांचा फीचर फोन ते स्मार्टफोन असा प्रवास सुलभ व्हावा यासाठी आयटेलबरोबर भागिदारी करून त्यांना व्होडाफोन सुपरनेट फोर जीचा समृद्ध अनुभव देताना आम्हाला आनंद होत आहे. परवडणारे हँडसेट्स आणि डेटाच्या वाजवी किंमतीमुळे डेटा वापरास चालना मिळेल, असे आम्हाला ठामपणे वाटते. कॅशबॅक ऑफर ग्राहकांचा हा डिजिटल प्रवास जास्त वाजवी आणि समृद्ध करेल.’

विविध वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या ए२० बरोबर फोर जी व्हीओएलटीई (व्हॉइस ओव्हर एलटीई) आणि व्हीआयएलटीई या सुविधा देण्यात आल्या असून ते अँड्रॉइड ७.० (नोगट) प्रणालीवर चालते. त्याला एक जीबी रॅम, आठ जीबीची इंटर्नल मेमरी आणि १.३ जीएचझेड क्वाड कोअर प्रोसेसरची जोड देण्यात आली आहे, ज्यामुळे स्मार्टफोनचा अनुभव आणखी सफाईदार होतो. ‘ए२०’ मध्ये दीर्घकाळ टिकणारी लिथियम- इयॉन बॅटरी समाविष्ट करण्यात आली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link