Next
‘गली गली सिम सिम’ ‘डीडी’वर आठवड्यातून सहा वेळा
प्रेस रिलीज
Tuesday, May 29 | 03:30 PM
15 0 0
Share this story

मुंबई : या उन्‍हाळी सुट्टीमध्‍ये मुलांना टेलिव्हिजन कार्यक्रम पाहाण्याची आकर्षक संधी मिळत आहे. जागतिकदृष्‍ट्या लोकप्रिय सेस्मे स्‍ट्रीट या कार्यक्रमाचे भारतीय रूपांतरण असलेला सर्वांच्‍या पसंतीचा शैक्षणिक व मनोरंजनात्‍मक कार्यक्रम ‘गली गली सिम सिम’ आता डीडी नॅशनलवर आठवड्यातून सहा वेळा सादर होत आहे.

आरोग्‍यपूर्ण शरीर व मन या थीमवर खास सेगमेंट्सचे प्रसारण सोमवार ते शुक्रवार तीन ते चार या वेळेत डीडी नॅशनलवर करण्‍यात येत आहे. खास आठवड्याच्‍या सिरीजमध्‍ये भर म्‍हणून कार्यक्रमाचा नववा सीझन शनिवारी सकाळी १०.३० रोजी प्रसारित करण्‍यात येत आहे.

मुलांना स्वस्थ राहण्यासाठी प्रोत्साहन देणारे अनेक एपिसोड्स या कार्यक्रमात आहेत. डीडी नॅशनलवर सादर होत असलेल्‍या या खास एपिसोड्मध्‍ये मुलांना आनंदी व स्‍वस्‍थ कसे राहावे यावर महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे. कार्यक्रमामध्‍ये लाइव्‍ह अॅक्‍शन सेगमेंटस् देखील आहेत, जे छोट्या दर्शकांसाठी भारताच्‍या विविध भागांतील कथा आणणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रसारण दूरदर्शनच्‍या डीडी गिरनार (गुजराती), डीडी सह्याद्री (मराठी), डीडी बिहार, डीडी उत्‍तर प्रदेश, डीडी मध्‍य प्रदेश आणि डीडी राजस्‍थान या प्रादेशिक चॅनेल्‍सवर देखील करण्‍यात येते. शो सुरू झाल्‍यापासून १५० हून अधिक मुलांपर्यंत पोहोचला आहे.

दूरदर्शनच्या महासंचालिका सुप्रिया साहू म्‍हणाल्‍या, ‘गली गली सिम सिम मुलांना खूप आवडते. या शोने खूप लोकप्रियता प्राप्‍त केली आहे आणि केवळ मुलांकडूनच नाही तर पालकांकडूनही शोला पसंती मिळत आहे. आम्‍ही नेहमीच आकर्षक व मुलांच्‍या वयोमानास साजेशा विषयांची निवड करण्‍यावर भर देतो आणि ‘गली गली सिम सिम’ या सर्व गरजांची उत्‍तमरित्‍या पूर्तता करते.’

सेस्मे वर्कशॉप इंडियाच्या बिझनेस डेव्‍हलपमेंट आणि मार्केटिंग विभागाच्या प्रमुख मोना सिंग म्‍हणाल्या, ‘गली गली सिम सिमने मुलांच्‍या शिकण्‍याच्‍या परिणामांवरील प्रभाव सिद्ध केला आहे. हा शो मुलांबरोबरच घरातील अन्‍य व्‍यक्‍तीही मोठ्या प्रमाणावर पाहतात, ज्‍याचा पालकत्‍व व घरातील वातावरणावर प्रभाव पडतो. आतापर्यंत, ‘गली गली सिम सिम’ हा मुलांसाठी (०-८) असा एकमेव प्रोग्रॅम आहे, जो भारतात विनामूल्‍य प्रसारित होणाऱ्या टेलिव्हिजन चॅनेलवर प्रसारित होतो.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link