Next
अभ्यंकर विद्यामंदिरातील हस्तकला वस्तूंच्या प्रदर्शनाला प्रतिसाद
BOI
Tuesday, February 19, 2019 | 12:32 PM
15 1 0
Share this story

हस्तकला वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन करताना अॅड. सुमिता भावे.

रत्नागिरी :
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी हस्तकौशल्यातून साकारलेल्या ४०० वस्तूंचे प्रदर्शन परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात नुकतेच भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा अॅड. सुमिता भावे यांच्या हस्ते झाले. या वेळी मुख्याध्यापक विनोद नारकर व सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

प्रदर्शनात आमची रत्नागिरी ही संकल्पना घेण्यात आली होती. यामध्ये खोका, पुठ्ठ्यापासून बनवलेल्या महामार्गावरील विविध वाहनांच्या प्रतिकृती होत्या. समुद्रकिनाऱ्यावरील बोटी, मासे, तटरक्षक दल केंद्र, तसेच विमानतळ, हॉटेल्स, घरे, इमारतींच्या प्रतिकृतीही केल्या होत्या. विद्यार्थ्यांनी स्वतः शाळेत बनवलेल्या चांगल्या वस्तूंची निवड या प्रदर्शनासाठी करण्यात आली होती. कार्यानुभव विषयांतर्गत पहिली ते चौथीच्या बारा वर्गांतील विद्यार्थ्यांनी या वस्तू बनवल्या होत्या. 

हस्तकला वस्तू प्रदर्शन पाहताना विद्यार्थिनी.

पुठ्ठा, कागद, विविध प्रकारच्या खाऊचे खोके, खाऊचे रॅपर्स, आइस्क्रीमचे चमचे, काड्यापेट्या वापरून मुलांनी बनविलेल्या आकर्षक वस्तू त्यात होत्या. विद्यार्थ्यांनी रेखाटलेली काही चांगली चित्रेसुद्धा पाहायला मिळाली. कागदी फुले, पेन स्टँड, पुठ्ठ्यापासून केलेले हँगिंग पीस, शोभिवंत वस्तू यांनी या प्रदर्शनाची शोभा वाढली. हे प्रदर्शन पालक, विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात आले होते. तीन दिवसांत सुमारे एक हजार पालक आणि ६४९ विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन पाहिले.

हस्तकला वस्तू प्रदर्शनातील विविध वस्तू.

(प्रदर्शनाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
मकरंद About 24 Days ago
विद्यामंदिरचा छान आणि मुलांना प्रोत्साहन देणारा उपक्रम यामुळे मुलांना खरोखर प्रेरणा मिळते
0
0

Select Language
Share Link