Next
नारायण सन्याल, आचार्य भागवत
BOI
Thursday, April 26 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘सत्यकाम’ या कादंबरीमुळे गाजलेले प्रसिद्ध बंगाली लेखक नारायण सन्याल आणि गांधीवादी विचारवंत आचार्य भागवत यांचा २६ एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
.... 
नारायण सन्याल

२६ एप्रिल १९२४ रोजी कृष्णनगरमध्ये (बंगाल) जन्मलेले नारायण सन्याल हे प्रसिद्ध बंगाली कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. पेशाने सिव्हील इंजिनियर असणारे सन्यालबाबूंचा लेखनाकडे ओढा होता. विज्ञान, तंत्रज्ञान, इतिहास आणि सामाजिक विषयांवर त्यांनी लेखन केलं होतं.

‘बिस्वासघातक’ ही त्यांची मॅनहॅटन या अणुबॉम्बच्या प्रोजेक्टवरची गाजलेली साहित्यकृती आहे. पेरी मॅसन या गाजलेल्या व्यक्तिरेखेवर आधारित बॅरिस्टर पी. के. बासू ही त्यांची ‘काटा’ सीरिजमधली प्रसिद्ध व्यक्तिरेखा गाजली. त्यांनी लहान मुलांसाठीही लेखन केलं होतं. 

त्यांच्या ‘सत्यकाम’ या अत्यंत गाजलेल्या कादंबरीवर हृषीकेश मुखर्जी यांनी धर्मेंद्र, शर्मिला टागोरला घेऊन सुंदर हिंदी सिनेमा बनवला होता. त्यांच्या अनेक कथांवर बंगालीमध्ये सिनेमे बनले आहेत.

त्यांना रबीन्द्र पुरस्कार, बंकिम पुरस्कार, नरसिंघ पुरस्कार असे अनेक सन्मान मिळाले होते. 

सात फेब्रुवारी २००५ रोजी त्याचं कोलकात्यात निधन झालं.
.....

सखाराम जगन्नाथ भागवत 

२६ एप्रिल १९०३ रोजी जन्मलेले सखाराम जगन्नाथ ऊर्फ आचार्य भागवत हे गांधी विचारांनी भारलेले आणि त्यांच्या प्रचारकार्यात सहभाग घेणारे एक विचारवंत होते. त्यांनी ‘आंतरभारती’साठी मोठं योगदान दिलं होतं. 

जीवन चिंतन, जीवन शिक्षण, जीवन व साहित्य, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

आठ जानेवारी १९७३ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link