Next
काजोल, जॉन ह्युस्टन
BOI
Sunday, August 05, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this article:

गेल्या दोन दशकांतली गुणी अभिनेत्री काजोल आणि अत्यंत लोकप्रिय दिग्दर्शक जॉन ह्युस्टन यांचा पाच ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
.....
काजोल 

पाच ऑगस्ट १९७४ रोजी मुंबईत जन्मलेली काजोल मुखर्जी ही आपल्या आईप्रमाणेच (तनुजा) हिंदी चित्रपटसृष्टीत सशक्त अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री. आपल्या आजोळकडून रतनबाई, शोभना समर्थ, नलिनी जयवंत, नूतन यांसारख्या एकाहून एक सरस गुणी अभिनेत्रींचे गुण रक्तात उतरलेल्या काजोलनेही अभिनयातली चमक दाखवली. अभिनयासाठीचे सहा फिल्मफेअर पुरस्कार, पाच स्क्रीन पुरस्कार आणि चार झी सिने-पुरस्कार मिळवून तो वारसा तिने सिद्ध केला आहे. १९९२ साली ‘बेखुदी’ फिल्ममधून पडद्यावर पदार्पण केल्यानंतर पुढल्या काही वर्षांतच बाजीगर, ये दिल्लगी, करण अर्जुन, गुप्त, इश्क, प्यार किया तो डरना क्या, हम आपके दिल में रहते है, माय नेम इज खान असे तिचे सिनेमे गाजले; पण खऱ्या अर्थाने ज्यांना ब्लॉकबस्टर म्हणता येतील असे तिचे सिनेमे म्हणजे - दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कुछ होता है आणि कभी ख़ुशी कभी गम!! दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या सिनेमाने तर नऊ वर्षांहून अधिक काळ एकाच थिएटरमध्ये मुक्काम करून ‘शोले’चा विक्रम मोडला होता. दुश्मन सिनेमातला तिचा अभिनयही वाखाणण्यासारखाच होता! ...
.......


जॉन ह्युस्टन 

पाच ऑगस्ट १९०६ रोजी नेवाडामध्ये जन्मलेला जॉन ह्युस्टन हा अमेरिकेचा अत्यंत गाजलेला आणि लोकप्रिय दिग्दर्शक, पटकथाकार आणि अभिनेता. प्रथितयश दिग्दर्शक म्हणून हॉलिवूडमध्ये यशस्वी होण्यापूर्वी त्याने बॉक्सर, पेंटर, घोडेवाला, बंडखोर तरुण, धरसोड्या इसम आणि रिपोर्टर अशा विविध भूमिकांमध्ये आपलं प्रत्यक्ष जीवन जगलं होतं. रंगभूमीवर अभिनय करताकरता त्याला हॉलिवूडमध्ये पटकथा लिहिण्याची संधी मिळाली. माल्टीज फाल्कन हा त्यानेच लिहून दिग्दर्शित केलेला हम्फ्री बोगार्टचा सिनेमा तुफान गाजला. दी ट्रेझर ऑफ सिएरा माड्री, दी अस्फाल्ट जंगल, दी आफ्रिकन क्वीन, दी मिस्फिट्स, फॅट सिटी, दी मॅन हू वुड बी किंग, दी नाइ ऑफ दी इग्वाना - असे त्याचे एकाहून एक सरस सिनेमे प्रसिद्ध आहेत. त्याला एकूण १५ वेळा ऑस्कर नामांकनं मिळाली होती आणि दोन वेळा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. २८ ऑगस्ट १९८७ रोजी त्याचा ऱ्होड आयलंडमध्ये मृत्यू झाला.
.........

यांचाही आज जन्मदिन :
अभ्यासू आणि विचक्षणी समीक्षक विजया राजाध्यक्ष (जन्म : पाच ऑगस्ट १९३३) 
‘महामहोपाध्याय’ आणि ‘साहित्यवाचस्पती’ दत्तो वामन पोतदार (जन्म : पाच ऑगस्ट १८९०, मृत्यू : सहा ऑक्टोबर १९७९)
वैदिक वाङ्‌मयाचे अभ्यासक-विचारवंत ना. गो. चापेकर (जन्म : पाच ऑगस्ट १८६९, मृत्यू : सहा मार्च १९६८)
(यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
ब्रूस लीच्या बरोबरीने एन्टर द ड्रॅगन सिनेमा गाजवणारा अभिनेता जॉन सॅक्सन (जन्म : पाच ऑगस्ट १९३५)
अभिनेत्री जेनेलिया डिसूझा-देशमुख (जन्म : पाच ऑगस्ट १९८७) 
मध्यमगती गोलंदाज व्यंकटेश प्रसाद (जन्म : पाच ऑगस्ट १९६९) 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search