Next
भारतात फुफ्फुसांच्या कर्करोगात वाढ
दर वर्षी सुमारे ६३ हजार नवे रुग्ण पडतात या आजाराला बळी
प्रेस रिलीज
Wednesday, November 28, 2018 | 12:39 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘२०व्या शतकाच्या सुरुवातीला फुफ्फुसांचा कर्करोग हा काहीसा दुर्मिळ आजार होता. दर एक लाखातील फक्त ५ लोकांना हा आजार होत असे; मात्र आज फुफ्फुसांच्या कर्करोगांमध्ये बरीच वाढ झाली असून, जगभरात सर्वाधिक होणाऱ्या कर्करोगातील हा एक कर्करोग मानला जातो. भारतातही फुफ्फुसांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असून, आहे. दर वर्षी या कर्करोगाचे सुमारे ६३ हजार नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळेच, या आजाराबद्दल कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसल्यास किंवा धोकादायक स्थितीत असल्यास तातडीने तपासण्या करून घ्याव्यात,’ असे आवाहन ‘डॉक्सअॅप’ या मेडिकल अॅपच्या ऑपरेशन्स विभागाच्या प्रमुख डॉ. गौरी कुलकर्णी यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या, ‘जागतिक आरोग्य परिषदेच्या (डब्ल्यूएचओ) आकडेवारीत फुफ्फुसांचा कर्करोग हा सर्वात मोठा कर्करोग ठरल्याचे नमूद करण्यात आले आहे. सिगारेट किंवा विडी ओढणे हे फुफ्फुसांचा कर्करोग होण्यामागील सर्वात सामान्य कारण आहे. भारतात फुफ्फुसाचा कर्करोग असणारे ८७ टक्के पुरुष आणि ८५ टक्के महिला असून, ते सातत्याने धूम्रपान करणारे आहेत. सिगारेटपेक्षा विडीतील घटक अधिक कर्करोगकारक असतात. भारतात विडी ओढण्याचे प्रमाण अधिक आहे. नवी दिल्लीचा विचार केला, तर सर गंगा राम हॉस्पिटलने (एसजीआरएच)केलेल्या अभ्यासानुसार, धूम्रपान केल्याने फुफ्फुसाचा कर्करोग झालेल्या प्रत्येक रुग्णामागे धूम्रपान न करणारा एक रुग्ण असे प्रमाण आहे. तंबाखूजन्य पदार्थांसोबतच वायुप्रदूषण, युरेनियम, रेडिएशन आणि अॅस्बेस्टॉससारखे औद्योगिक पदार्थ आणि पोषकतत्त्वांची कमतरता ही कर्करोग उद्भवण्यामध्ये महत्त्वाची कारणे आहेत.’

डॉ. गौरी कुलकर्णीफुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे व्यक्तिगणिक बदलतात आणि बऱ्याचदा आजार फार पुढच्या पातळीवर गेल्यानंतरच ती दिसू लागतात. सतत छातीत दुखणे, अपुरा श्वास, कमी न होणारा आणि मध्येच प्रचंड उफाळून येणारा खोकला, खोकल्यातून रक्त येणे, घरघर, हाडांचे दुखणे, सततची डोकेदुखी, थकवा, बोटे वाकडी होणे आणि मान आणि चेहऱ्यावर सूज ही फुफ्फुसांच्या कर्करोगाची काही सामान्य लक्षणे असल्याची माहिती डॉ. कुलकर्णी यांनी दिली.

फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची शक्यता टाळण्यासाठी सगळ्यात परिणामकारक उपाय म्हणजे धूम्रपान सोडणे असल्याचे अधोरेखित करून डॉ. कुलकर्णी यांनी अॅस्बेस्टॉस फायबरची धूळ आणि इतर कर्करोगकारक घटकांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला. गृहबांधणी सामुग्री आणि ऑटोमोबाइल्स पार्टस् आणि टेक्सटाइलमध्ये अॅस्बेस्टॉसचा वापर केला जातो. फायबर्स असलेल्या सहा नैसर्गिक खनिजांपासून अॅस्बेस्टॉस बनवले जाते. फुफ्फुसांच्या कर्करोगाशी आणि श्वसनाच्या इतर आजारांशी याचा थेट व वैज्ञानिक संबंध आहे. नियमितपणे व्यायाम आणि योग करून शरीर सुदृढ ठेवल्यास, तसेच विविध फळे आणि भाज्यांचा समावेश असलेला पोषक आहार घेतल्यास फुफ्फुसांचा कर्करोग बऱ्याच अंशी टाळता येईल,’ असे त्यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link