Next
सुकन्या हातणकर यांचे ‘धूरमुक्त मुरबाड’साठी प्रयत्न
BOI
Saturday, September 22, 2018 | 02:23 PM
15 0 0
Share this storyमुंबई : नुकत्याच झालेल्या गौरी गणपतीच्या सणाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील आदिवासी महिलांना गॅस कनेक्शनचे मोफत वाटप करण्यात आले. श्री गजानन गॅस एजन्सीच्या मुरबाड येथील प्रोप्रायटर सुकन्या सुरेश हातणकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत धूरमुक्त मुरबाडच्या दिशेने हे पाऊल उचलले आहे.

सुकन्या हातणकर या मराठी साहित्य विषय घेऊन एमए झाल्या असून, त्या टिटवाळा (ता. कल्याण) येथील रहिवासी आहेत. त्यांना लहानपणापासूनच आई-वडिलांकडून सामाजिक कार्याचे बाळकडू मिळाल्याने हा वारसा घेत गेली अनेक वर्षे या क्षेत्रात कार्यरत असून, गरीब व गरजू व्यक्तींना प्रामाणिकपणाने मदत करत आहेत. या कामाचे फळ त्यांना श्री गजानन एचपी गॅस एजन्सीच्या रूपाने मिळाले. हातणकर यांचे सामाजिक क्षेत्रातले गुरु राजाभाऊ पातकर आणि त्यांना खंबीर साथ देणारे त्यांचे पती यांच्यामुळे त्या एचपी गॅस एजन्सीच्या दोन वेळा लकी ड्रॉ विनर (मुरबाड) ठरल्या. मिळालेल्या या संधीचा फायदा घेत त्यांनी मुरबाड येथील आदिवासी बहुल भागात जाऊन तेथील महिलांची सध्याची परिस्थिती जाणून घेतली आणि पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून हा भाग धूरमुक्त करण्याचे ठरविले.

याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, ‘उज्ज्वला योजना आणि श्री गजानन गॅस एजन्सीच्या रूपाने मला आदिवासी बहुल भागात जाण्याची संधी मिळाली. आता जास्त वेळ आदिवासी भागात जाऊन तेथील माता-भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद पसरविण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न असून, त्या दृष्टीने माझे काम सुरू आहे. मी स्वतः सर्व भागात जाऊन महिलांना एकत्र करून माहिती देत आहे आणि त्यांनाही आपले कुणीतरी आहे, असे वाटून त्या महिलाही तितक्याच प्रेमाने साथ देत आहेत. लोक अहोरात्र देवापुढे तुपाचा दिवा लावून न बोलणाऱ्या मूर्तीच्या मागे सुखासाठी धावतात; पण आम्ही दिवसातले सगळे तास या लोकांच्या मागे घालवतो व त्यात आम्हाला खरा भगवंत दिसतो यापेक्षा दुसरे सुख कोणतेच नाही.’

‘गौरी गणपतीच्या सणाचे औचित्य साधून या माता भगिनींना त्यांच्या हक्काचे वाण दिले. विशेष म्हणजे माझी एजन्सी चालू होऊन फक्त तीनच महिने झाले आहेत, तरीही माझ्याकडे ७०० अर्ज जमा आहेत प्रत्येक महिन्याला १०० कनेक्शन देऊन हा व आजूबाजूचा परिसर धूरमुक्त करण्याचा माझा मानस आहे. त्यासाठी माझा संपूर्ण स्टाफ ही तेवढीच मेहनत घेत आहे. दिलेली कनेक्शन व्यवस्थित लावण्यासाठी माझा मेकॅनिक तिथे जातीने लक्ष घालून कनेक्शन विनामोबदला लावून देत आहे आणि त्याची माहितीही देत आहे,’ असे हातणकर यांनी सांगितले.

या कामाचा पुढील टप्पा म्हणून महिलांना गॅस वापरताना घेण्यात येणारी काळजी आणि आपण व आपल्या आजूबाजूचा परिसर कसा सुरक्षित ठेवावा याविषयीचे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार असल्याची माहिती हातणकर यांनी दिली.  

नुकत्याच पार पाडलेल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी भाजपचे महासचिव श्री. पातकर यांच्यासह मान्यवर मंडळी आणि स्वयंसेवक उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Neha pramod gujare About 152 Days ago
Very nice job done God bless you dear friend
1
0
Rohit Waghulkar About 153 Days ago
अभिनंदन भविष्य वाटचालीसाठी शुभेच्छा...
1
0
Dr. Shaikh. A. A. About 154 Days ago
Congratulation: sukanya Hatankar, you are charged by God's strength Now no one couldn't be hardal on your path.keep it up ,you will succeed in your project which you have decided. God will give you strength.Hope for best. Thank God.
1
0
Vikas About 154 Days ago
Very nice
1
1

Select Language
Share Link