Next
भैयासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
मिलिंद जाधव
Saturday, December 15, 2018 | 04:36 PM
15 0 0
Share this article:

पालघर : भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष भैयासाहेब आंबेडकर यांची १०६‌ वी जयंती भारतीय बौद्ध महासभेच्या वाडा तालुका शाखेतर्फे वाडा तालुक्यातील रमाई नगर-कुडूस बुद्धविहारामध्ये साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी महासभेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जाधव, नारायण जाधव, रिपाइं जिल्हा सरचिटणीस डी. जी. भोईर, तालुकाध्यक्ष आनंद भोईर, सचिन भोईर, पीआरपी जिल्हाध्यक्ष स्वप्नील जाधव, तालुकाध्यक्ष संजय जाधव, भारिप बहुजन महासंघ युवा आघाडी तालुकाध्यक्ष रितेश गायकवाड, कुडूस ग्रामपंचायत सदस्य सचिन जाधव, मंदा कांबळे, अतिश बागुल, विनोद वाघचौरे, मोहन जाधव, संदेश थुले, निकेत थुले, ऋतिक थुले, महिला सचिव रश्मी भोईर आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.



कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुकाध्यक्ष सुजय जाधव यांनी भूषवले. कुडूस येथील आशा अशोक भोईर व भिवंडी तालुक्यातील पारिवली येथील बारकुबाई बाळाराम गायकवाड या दोन महिला बुद्धगया येथे भगवान बुद्धांना अभिवादन करून आल्यानिमित्त या दोघींचाही या वेळी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मनीष मंगेश भोईर यांची कुडूस विभाग भारिप बमसंच्या युवा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

या कार्यक्रमात कुडूस, वडवली, नेहरोली, कोंढले-म्हसवळ, खुपरी, जामघर, चांबळे, वाडा येथील नागरिक सहभागी झाले होते. कुडूस येथील महिला मंडळ व वडवली, कोंढले-म्हसवळ, कुडूस येथील युवावर्गाचे या वेळी विशेष सहकार्य लाभले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search