Next
‘ला क्लास’ वार्षिक रनवे फॅशन शो १६ डिसेंबर रोजी
प्रेस रिलीज
Monday, December 11, 2017 | 02:06 PM
15 0 0
Share this article:

पुणे : फॅशन शो हे नेहमीच आकर्षक कार्यक्रम ठरत आले आहेत, कारण ते संबंधित प्रदर्शनाला चालना आणि संबंधित ब्रँडसना प्रसिद्धी देतात. फॅशन शो कल्पक डिझायनर्सना त्यांचे काम प्रेक्षकांपुढे प्रदर्शित करण्यासाठी प्लॅटफॉर्म पुरवतातच, शिवाय मॉडेल्सनाही रॅम्पवर पदन्यास व बुद्धिमत्तेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळवून देतात.
हेच उद्दीष्ट मनात ठेवून ‘सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’ने (एसआयएफटी) आपल्या बावधन कॅम्पसमध्ये १६ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता ‘ला क्लास’ या सातव्या वार्षिक रनवे फॅशन शोचे आयोजन केले आहे.  ‘सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’ (एसआयएफटी) विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांद्वारे त्यांच्या करिअरमध्ये अधिकाधिक शक्यतांचा शोध घेण्यासाठी नवनवे पर्याय पुरवते.

या फॅशन शोमागे विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी परिपूर्ण अनुभव मिळावा, जेथे ते शोमधील संकल्पनेवर आधारित सुंदर रचनांना ग्राहकांच्या गरजानुरुप बनवतील, ही कल्पना आहे. एसआयएफटीचे दुसऱ्या व तिसऱ्या वर्षांचे आणि पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी या शोमध्ये सहभाग घेऊन कार्य़क्रमाच्या य़शस्वितेसाठी प्रयत्न करत आहेत.  त्यांची ‘न्यू स्टाईल इनोव्हेशन’ ही टॅगलाईन या फॅशन शोच्या आर्किटेक्चर, बायो-मिमिक व सिंथेसिस अशा तीन मध्यवर्ती संकल्पना स्पष्ट करते.

आर्किटेक्चर -  चार गट वास्तुविद्या (आर्किटेक्चर), बांधकाम (कन्स्ट्रक्शन) व वास्तुविद्येत वापरल्या जाणाऱ्या रेषा यांच्या विविध पैलूंवर काम करत आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांची प्रेरणा आधुनिक व पुरातन वास्तुविद्या, मॉस्को चर्च, मोरक्कन वास्तुविद्या, सारख्या सुंदर वारसा रचना, मून टॉवर, राजस्थानी खिडक्या यांसारख्या सुंदर वारसा रचनांपासून घेतली आहे.
बायो-मिमिक – तीन गट आपल्या रचनांमधून निसर्ग प्रदर्शित करत आहेत. आकाशगंगा, महास्फोट व सपुष्प वेली यासारख्या विविध संकल्पनांवर हे गट काम करत आहेत.
सिंथेसिस – सिंथेसिसचा (संश्लेषण) अर्थ दोन विरुद्ध घटकांच्या समन्वयाने जोडलेली एक अखंड रचना. येथे विद्यार्थी आग-बर्फ, निसर्ग-यंत्रसामग्री आणि कोमल-कठीण असे दोन विरुद्ध घटक वापरुन पोशाख विकसित करत आहेत.

शोमध्ये शंभर विद्यार्थी त्यांच्या नव्वद प्रेरणादायी रचना आभूषणे व अलंकारांसहित अभिमानाने प्रदर्शित करत असून, आघाडीच्या १२ फॅशन मॉडेल्स हे पोशाख परिधान करुन रॅम्पवर दिमाखाने चालणार आहेत.
हा कार्यक्रम डिझायनर होण्याची आकांक्षा असणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांसाठी निःसंशय प्रचंड संधी खुल्या करणार आहे.

कार्यक्रमाच्या प्रवेशिकांचे मूल्य ३०० रुपये (ब्राँझ), ५०० रुपये (सिल्व्हर), ७०० रुपये (गोल्ड) व १००० रुपये (प्लॅटिनम) असे आहे.

कार्यक्रमाच्या प्रवेशिकांसाठी संपर्क : 
मुख्य कार्यालय – माया कदम, – ०२० २४३३०४३५
पीआयएटी – अजित शिंदे,  – ०२० २४३३०४२५
बावधन – कांचन,  – ०२० ६७९०१३००

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search