Next
‘जेट एयरवेज’ला ‘बोईंग’कडून मिळाले पहिले ७३७ मॅक्स
प्रेस रिलीज
Saturday, June 23, 2018 | 05:00 PM
15 0 0
Share this storyमुंबई : जेट एयरवेज या भारतातील उच्चभ्रू आंतरराष्ट्रीय एयरलाइन कंपनीला बोईंगकडून ‘७३७ मॅक्स’ विमान मिळाले. यामुळे कंपनी हे नवीन आणि अत्याधुनिक विमान वापरणारी पहिली कंपनी ठरली आहे. हे विमान दोन आकडी इंधनक्षमता आणि ग्राहकांसाठी अधिक चांगला आरामदायीपणा पुरवणारे आहे.

‘नवे ‘७३७ मॅक्स’ भविष्यातील आमच्या विकास धोरणासाठी अतिशय महत्त्वाचे आहे आणि हे नवे विमान ग्राहकांना उपलब्ध करून देणारे भारतातील आम्ही पहिलेच आहोत. गेल्या कित्येक वर्षांपासून ‘७३७’ आमच्या ताफ्याचा कणा ठरलेले असून, नव्या ‘७३७ मॅक्स’मुळे ताफ्यात आणखी चांगल्या क्षमतेचा समावेश करताना आम्हाला आनंद होत आहे. सुधारित अर्थकारण आणि इंधनक्षमता तसेच ग्राहकांसाठीचा आरामदायीपणा ही मॅक्सची वैशिष्ट्ये भारतातील उच्चभ्रू एयरलाइन्सचे आमचे स्थान अधिक बळकट करतील,’ असे जेट एयरवेजचे अध्यक्ष नरेश गोयल म्हणाले.

जेट एयरवेज ही भारतातील दुसरी सर्वात मोठी विमानकंपनी असून, तिच्या ताफ्यात आशिया, युरोप, उत्तर अमेरिका आणि इतरत्र ठिकाणच्या १५ देशांतील ६५ देशांना सेवा देणाऱ्या ११९ विमानांचा समावेश आहे. यात जेट एयरवेजने बोईंगला दिलेल्या पहिल्या ‘१५०’, ‘७३७ मॅक्स’ विमानांचा, तसेच २०१५च्या सुरुवातीला ७५ जेट्सच्या दोन स्वतंत्र कंत्रांटाचा आणि या वर्षाच्या सुरुवातीला दिलेल्या कंत्राटाचा समावेश आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link