Next
‘टाटा मोटर्स सोल’तर्फे ‘लदाख ड्राइव्ह माउंटन ट्रेल’चे दुसरे पर्व
प्रेस रिलीज
Monday, July 22, 2019 | 01:42 PM
15 0 0
Share this article:


नवी दिल्ली : ‘टाटा मोटर सोल’तर्फे (एसयूव्ही ओनर्स युनायटेड लीग) आपल्या आगामी सोल ‘आयकॉनिक लदाख ड्राइव्ह माउंटन ट्रेल, स्पिती-लदाख’ घोषणा केली असून, ती १३ ते २५ जुलै २०१९ या काळात होणार आहे. या ड्राइव्हमध्ये पँगाँग त्सो व पनामिकच्या सौंदर्यपूर्ण अनुभवाला खारदुंग ला आणि सभोवतालच्या परिसरातील साहसी ड्राइव्हिंगच्या अनुभवाची जोड दिली जाते. खारदुंग ला ही १७ हजार ५०० फूटांहून अधिक उंचावरील काही मोजक्या मोटरेबल पर्वतीय खिंडींपैकी (माउंटन पास) एक आहे. या ड्राइव्हदरम्यान सदस्यांना काझातील प्राचीन बौद्ध विहार व नुब्रा व्हॅलीला भेट देण्याचीही संधी मिळेल.

या उपक्रमाविषयी बोलताना टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन व्यवसाय विभागाचे मार्केटिंग प्रमुख विवेक श्रीवास्तव म्हणाले, ‘सोल इव्हेंट्स सुरुवातीपासून आपल्या सदस्यांना एक अनोखा साहसी अनुभव देत आल्या आहेत. सोलचे हे व्यासपीठ खास विकसित केलेल्या ड्राइव्ह्ज व अनुभव सदस्यांना देते याची माहिती फार थोड्या लोकांना आहे. ही आवृत्ती सोल सदस्यांना अत्यंत खडतर व आव्हानात्मक अशा रोमांचक प्रवासाची संधी देण्यासाठी खास क्युरेट करण्यात आली आहे. व्हॅलीच्या अंतरंगात शिरण्यासाठी त्यांना पंचमहाभूतांचा सामना करावा लागणार आहे. प्रत्येक आवृत्तीसोबत सहभागी सदस्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सोल समुदायामध्ये बंधुत्वाचा कायम टिकणारा बंध निर्माण झाला आहे. आपले साहसी वीर आणि टाटा एसयूव्ही यांच्यासह ही सोल ड्राइव्ह सदस्यांना लदाख व परिसरातील काही अत्यंत अविश्वसनीय व आत्तापर्यंत फारशा न बघितल्या गेलेल्या जागा बघण्याची संधी देणार आहे.’

आयकॉनिक ड्राइव्हला सुरुवात चंडीगढपासून होत आहे. १० एसयूव्हींच्या ताफ्यातून ३१ सहभागी सदस्यांचा प्रवास सुरू होईल. हा प्रवास टाटा एसयूव्हीच्या मालकांना एक अविस्मरणीय अनुभव देणारा ठरेल. साहसाच्या शोधात निघालेल्या या सदस्यांना १६०० किलोमीटर्सहून अधिक ड्राइव्‍ह करण्याची संधी मिळेल. हिमाचल प्रदेशामधील निसर्गाच्या साथीने प्रवास करत, स्पितीची चित्तवेधक खोरी व सरोवरे पार करत ते लदाखमध्ये पोहोचतील. त्यांना ड्रायव्हिंगची कौशल्ये या वेळी सर्वोच्च टप्प्यावर नेणे आवश्यक ठरेल. कारण, या भागातील सर्वांत मोठ्या आव्हानात्मक कच्च्या रस्त्यांवरून त्यांना गाडी हाकावी लागणार आहे. यातून काही आयुष्यभर टिकणारे बंध निर्माण होतील.’

टाटा एसयूव्ही ओनर्स युनायटेड लीग (सोल) हा एक टाटा मोटर्स गाड्यांच्या मालकांचा समुदाय आहे. श्वास रोखून धरायला लावणाऱ्या प्रदेशांमधील साहसी ड्राइव्ह्जच्या माध्यमातून टाटा एसयूव्ही ओनर्सना एकत्र आणणारा उपक्रम सोल घेते. २०१२मध्ये सोलची स्थापना झाल्यापासून समुदायाची संख्या १३ हजार सदस्यांपर्यंत पोहोचली आहे, या सर्वांना सोल सदस्यत्वाचा विशेष अभिमान आहे. सोल रिवॉर्डस् प्रोग्रामसोबतच हा सोल उपक्रम ग्राहकांना टाटा मोटर्स जेन्युइन अॅक्सेसरीज, विस्तारित वॉरंटी व विमा अशा काही एक्स्लुजिव ऑफर्स देतो. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search