Next
पिंपरी-चिंचवडमध्ये छटपूजा उत्साहात साजरी
BOI
Wednesday, November 14, 2018 | 04:28 PM
15 0 0
Share this article:


पिंपरी-चिंचवड : उत्तर भारतात सूर्यदेव आणि छट माता यांची पूजा म्हणजे छटपूजेची प्राचीन परंपरा आजही भक्तिभावाने जोपासली जाते. महाराष्ट्रात राहणारे उत्तर भारतीयही मोठ्या उत्साहाने ही छट पूजा साजरी करतात. विशेष म्हणजे या पूजेत वारकरीही आनंदाने सहभागी होतात. यंदाही हजारो लोकांच्या साक्षीने इंद्रायणी नदीच्या काठावर हा विलक्षण सोहळा रंगला.


पिंपरी-चिंचवडमधील हनुमान मित्रमंडळ आणि विश्व श्रीराम सेना सामाजिक संघटनेच्या वतीने छटपूजेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गंगा नदीच्या आरतीप्रमाणे, इंद्रायणीच्या तीरावरही भल्या मोठ्या समयांसह महाआरती करण्यात आली. दुसरीकडे टाळ मृदंगाच्या तालावर वारकऱ्यांनी फेर धरला होता. हा अनुपम सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक जमले होते. 

‘या उत्सवात सर्वजण घरातील सर्वांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभू दे, जगाचे कल्याण होऊ दे, अशी प्रार्थना सूर्यदेवाला करतात. हा उत्सव साजरा करण्यासाठी या परिसरात राहणारे उत्तर भारतीय नागरिक इंद्रायणी नदीच्या काठी जमले होते. त्यांच्या समवेत स्थानिक नागरिक, वारकरीही मोठ्या उत्साहाने उपस्थित राहिले. हा सोहळा उत्तमप्रकारे साजरा व्हावा यासाठी सर्वांनी सहकार्य लाभले आहे’, असे लालबाबू गुप्ता यांनी सांगितले.  


मावळत्या सूर्याला अर्घ्य देत सुरू झालेली ही सृष्टीतील पंचमहाभूतांची पूजा माणसाला निसर्गाचे महत्त्व सांगते. सर्वशक्तिमान निसर्गाची उपासना असलेली ही पूजा सामाजिक सलोख्याचा संदेश देण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरली. दोन वेगवेगळ्या परंपरांचा हा अनोखा संगम सर्वांचाच उत्साह द्विगुणित करणारा ठरला. या अनोख्या छटपूजेने नवा पायंडा पाडला आहे.

(या सोहळ्याचे ड्रोनने केलेले चित्रीकरण पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search