Next
शाओमीतर्फे स्मार्टफोन व एलईडी टीव्ही सादर
प्रेस रिलीज
Friday, February 23, 2018 | 02:37 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘शाओमी’ने एका भव्य समारंभात तीन नवीन उत्पादनांचे अनावरण केले. यात जगाला ‘रेडमी नोट फाइव्ह प्रो’ची पहिली झलक पाहायला मिळाली आणि पहिल्यांदाच शाओमीने चीनबाहेरील जागतिक बाजारपेठेमध्ये आपला टीव्ही लाँच केला.

‘रेडमी नोट फाइव्ह’ व ‘रेडमी नोट फाइव्ह प्रो’ या डिवाइसेसने भारतातील एमआय फॅन्ससाठी अभूतपूर्व दरांमध्ये फुल स्क्रिन डिस्प्लेमधील नाविन्यता सादर केली आहे. या डिवाईसेसची किंमत ९,९९९ रुपयांपासून सुरू होते. अत्यंत यशस्वी आणि काऊंटरपॉइंटनुसार २०१७मधे भारतात सर्वाधिक विक्री झालेला स्मार्टफोन, रेडमी नोट फोरने अभूतपूर्व दरामध्ये दर्जा व डिझाइन सादर करण्याची शाओमीची कटिबद्धता सिद्ध केली आहे. युजर्स रेडमी नोट सिरीजमधून सर्वोत्तम डिवाईसेसची अपेक्षा करत असताना, हे दोन नवीन स्मार्टफोन्स डिझाइन, कॅमेरा व कामगिरीच्या संदर्भात त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करतील.

शाओमीचे उपाध्यक्ष व शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनू जैन म्हणाले, ‘शाओमीमध्ये आम्ही सर्वांना वाजवी दरात उच्च दर्जाचे डिवाइसेस देण्यासाठी कार्य करतो. आमची सर्व उत्पादने आमची मूल्ये आणि आम्ही करत असलेल्या अथक प्रयत्नांचे प्रतीक आहेत. आम्ही रेडमी नोट फाइव्ह, रेडमी नोट प्रो व एमआय एलईडी टीव्ही फोर या तीन नवीन उत्पादनांसह २०१८ची सुरुवात करण्यास उत्सुक आहोत. आम्ही आशा करतो की, एमआय फॅन्स आम्ही सादर करत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा आनंद घेतील.’ 

जागतिक स्तरावर शाओमीच्या लक्षणीय बदलासह पहिल्यांदाच ‘एमआय टीव्ही’ चीनबाहेरील बाजारपेठेमध्ये दाखल होत आहे. १३८.८ सेमी (५५ इंची) एमआय एलईडी स्मार्ट टीव्ही फोर, हा जगातील सर्वात स्लीम एलईडी टीव्ही आहे. हा टीव्ही फक्त ४.९ मिमी स्लिम असून, टीव्हीमध्ये भारतीयांसाठी रिडिझाइन केलेले इंटेलिजंट कंटेंट-फर्स्ट पॅचवॉल सॉफ्टवेअर आहे. ३९,९९९ रुपये किंमत असलेला एमआय एलईडी टीव्ही फोर भारतातील टीव्ही क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यास सज्ज आहे. 

रेडमी नोट फाइव्ह प्रो हा जगातील पहिले स्मार्टफोन आहे; ज्यामध्ये ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६३६ आहे. स्नॅपड्रॅगन ६३६ पॅकेजचा भाग म्हणून रेडमी नोट फाइव्ह प्रोमध्ये क्वॉलकॉम क्रायो कोअर आहे. हे कोअर सामान्यतः एसआयसीएसच्या प्रमुख स्नॅपड्रॅगन ८०० सिरीजमध्ये आढळते. एक लाखाहून अधिक अॅोनटूटू बेंचमार्क स्कोअर्ससह रेडमी नोट फाइव्ह प्रो आठ क्रायो २६० कोर, अँड्रेनो ५०९ जीपीयू आणि सहा जीबीपर्यंतच्या डीडीआर४एक्स रॅमसह सर्वोत्तम डिवाईस आहे.

रेडमी नोट फाइव्हमध्ये रेडमी नोट फोर व इतर डिवाइसेसची वैशिष्ट्ये सामावलेली आहेत. रेडमी नोट फाइव्ह प्रोमधील १८.९ एचडी डिस्प्लेप्रमाणे तयार करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये एसओसी, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६२५ आहे. १२ मेगापिक्सल रिअर कॅमेरा चार जीबी रॅम व ६४ जीबी स्टोरेज क्षमता असलेला रेडमी नोट फाइव्ह, प्रत्येक पैलूमध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या रेडमी नोट फोरच्याही काही पावले पुढे आहे. रेडमी नोट फाइव्हमध्ये दीर्घकाळ टिकणारी बॅटरी असून, पूर्वीच्या डिवाइसपेक्षा अधिक अपग्रेड केलेली वैशिष्ट्ये आहेत. रेडमी नोट फाइव्ह प्रो प्रमाणे या स्मार्टफोनमध्ये एलईडी सेल्फी-लाइट आहे. ज्यामुळे अंधुक प्रकाशातदेखील परिपूर्ण सेल्फी काढता येतात. रेडमी नोट फाइव्हची किंमत तीन जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी ९,९९९ रुपये आणि चार जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी ११,९९९ रुपये आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search