Next
नागरिकांना ‘आय. टी. दिंडी’ उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन
BOI
Thursday, June 20, 2019 | 12:39 PM
15 0 0
Share this article:



पुणे :
माहिती तंत्रज्ञान (आय.टी.) क्षेत्रातील लोकांनी एकत्र येऊन ‘आय.टी.दिंडी’ हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमात सहभागी झालेले लोक आळंदी ते पुणे असा प्रवास वारीसोबत पायी चालून करतात;तसेच काहीजण पुढे पंढरपूरपर्यंत जातात. या दरम्यान वारकऱ्यांची सेवा करणे आणि इतर समाजोपयोगी कामे केली जातात. जास्तीत जास्त लोकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयटी दिंडीच्या आयोजकांनी केले आहे. 
    
उपक्रमात आय.टी., बीपीओ व इतर क्षेत्रातील सर्व नागरिक सहभागी होऊ शकतात. या वर्षी आळंदी ते पुणे हा प्रवास २६ जूनला आणि पुणे ते सासवड हा प्रवास २८ जूनला केला जाणार आहे. ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यांनी www.waari.org या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search