Next
विश्वेश्वर बँकेच्या अध्यक्षपदी अनिल गाडवे
प्रेस रिलीज
Monday, August 20 | 05:14 PM
15 0 0
Share this story

अनिल गाडवे
पुणे :  दी विश्वेश्वर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अनिल गाडवे यांची,तर सीए मनोज साखरे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध झाली. संचालक मंडळाची वर्ष २०१८-१९ साठी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड करण्यासाठीची निवड सभा नुकतीच पार पडली. या सभेत या दोन्ही निवडणुका बिनविरोध झाल्या. अॅड. कमलाकर मांगले, सहाय्यक निबंधक (निवृत्त), सहकारी संस्था हे निवडणूक निर्णय अधिकारी होते.

अनिल गाडवे हे पुण्यातील प्रसिद्ध ‘काका हलवाई स्वीटस्’ या फर्मचे भागीदार असून, मनोज साखरे हे चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. बँकेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश गंधे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले.

मनोज साखरे
या वेळी गाडवे म्हणाले, ‘या वर्षी आपल्या बँकेपुढे अनेक आव्हाने आहेत. बँकेचे व्यवसाय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपणा सर्वांना अधिक परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. लवकरच बँक बचत गटांना कर्ज पुरवठा योजना कार्यान्वित करणार असून, ग्राहकांना इंटरनेट बँकिंग सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. बँकेला शेड्यूल दर्जा मिळवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.’

या सभेत बँकेचे संचालक सुनिल रुकारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. रवींद्र पवार, उपसरव्यवस्थापक यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link