Next
जेम्स बॅरी, रिचर्ड अॅडम्स, दुर्गादास संत
BOI
Wednesday, May 09 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘पीटर पॅन’ या अत्यंत गाजलेल्या व्यक्तिरेखेचा जन्मदाता जेम्स बॅरी, ‘वॉटरशिप डाउन’ या कादंबरीचा लेखक रिचर्ड अॅडम्स आणि कोशकार दुर्गादास संत यांचा नऊ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
......
जेम्स बॅरी 

नऊ मे १८६० रोजी स्कॉटलंडमध्ये जन्मलेला जेम्स बॅरी हा कादंबरीकार आणि नाटककार म्हणून प्रसिद्ध होता. सुरुवातीला ‘ऑल्ड लिख्ट आयडल्स’ या स्फुटलेखनातून आणि ‘ए विंडो इन थर्म्स’ या कथासंग्रहातून त्याने आपल्या जन्मगावच्या रम्य आठवणी चितारल्या होत्या. त्याची नंतर आलेली ‘दी लिटल मिनिस्टर’ ही कादंबरीसुद्धा गाजली. त्याच्या सुरुवातीच्या लिखाणातून अस्सल स्कॉटिश विक्षिप्तपणा, विनोद आणि करुणा यांचं मिश्रण होतं.

त्याची सर्वांत गाजलेली व्यक्तिरेखा म्हणजे पीटर पॅन (दी बॉय हू वुडन्ट ग्रो अप). याच नावाच्या नाटकातून १९०४ साली रंगभूमीवर आलेली ही व्यक्तिरेखा प्रचंड गाजली. ‘नेव्हरलँड’ नावाच्या प्रदेशात पऱ्यांनी सांभाळ करून वाढवलेला आणि हवेत उडू शकणारा हा अनाथ मुलगा. इंग्लंडमध्ये त्याची दोस्ती ‘वेंडी’शी होते. नेव्हरलँडमधल्या मुलांची आई बनून राहण्यासाठी तो तिला घेऊन नेव्हरलँडला जातो. पुढे त्यांना कॅप्टन हुक या समुद्री चाच्याशी सामना करावा लागतो. त्याची कथा आणि त्या ओघात येणारी टिंकर बेल, टायगर लिली, क्रोकोडाइल, मर्मेड्स, स्मी यांसारखी इतर अनेक पात्रं यांनी ही कथा रंजक बनत जाते. या कथेवर पुढे सिनेमे आणि अॅनिमेशन फिल्म्सही बनल्या.

क्वालिटी स्ट्रीट, दी अॅडमिरेबल क्रिच्टन, व्हॉट एव्हरी वूमन नोज, दी ट्वेल्व्ह पाउंड लुक, दी वुइल आणि डीअर ब्रुटस ही बॅरीची अत्यंत गाजलेली इतर नाटकं. 

बेटर डेड, रिचर्ड सॅव्हेज, ए लेडीज शू, टू ऑफ देम, दी वेडिंग गेस्ट, हाल्फ अॅन अवर मेरी रोझ, अशी त्याची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

पाचव्या किंग जॉर्जने त्याला बॅरन पदवी देऊन त्याचा सन्मान केला होता. 

१९ जून १९३७ रोजी त्याचा लंडनमध्ये मृत्यू झाला.
.........  

रिचर्ड अॅडम्स

नऊ मे १९२० रोजी बर्कशरमध्ये जन्मलेला रिचर्ड अॅडम्स हा कादंबरीकार म्हणून ओळखला जातो. दहा लाखांहून अधिक प्रती खपलेली ‘वॉटरशिप डाउन’ ही त्याची प्रचंड लोकप्रिय कादंबरी. गंमत म्हणजे एका प्रवासात आपल्या मुलींच्या मनोरंजनासाठी त्याने मनात येईल तशी एक कथा रचून सांगता सांगता सशांच्या कळपाच्या जीजीविषेच्या या कहाणीचा जन्म झाला. तो सशांचा कळप आपल्या राहत्या ठिकाणाहून अधिक सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी निघतो आणि काय काय घडतं त्याची ही कहाणी. आपल्या मुलींच्याच आग्रहावरून त्याने ती लिहून प्रसिद्ध केली होती. या कादंबरीला कार्नेजी मेडल आणि गार्डिअन हे पुरस्कार मिळाले होते. 

त्याची दुसरी कादंबरी शार्डीक या दांडग्या अस्वलाची गोष्ट सांगणारी. तीसुद्धा गाजली होती. 

टायगर व्हॉयेज, दी प्लेग डॉग्ज, दी डे गॉन बाय, असं त्याचं लेखन प्रसिद्ध आहे. 

२४ डिसेंबर २०१६ रोजी त्याचा ऑक्सफर्डमध्ये मृत्यू झाला.
.......

दुर्गादास काशिनाथ संत 

नऊ मे १९१४ रोजी जन्मलेले दुर्गादास काशिनाथ संत हे वाङ्मयविश्लेषक आणि कोशकार म्हणून ओळखले जातात. 

त्यांनी साहित्यविषयक मूलगामी स्वरूपाचं चिंतन करून त्याविषयी विचार मांडले होते. 

शोधविज्ञान कोश, साहित्य आणि संस्कृती, मराठी स्त्री, साहित्य संमेलने आणि साहित्यिक प्रश्न, वाङ्मयीन विद्वत्ता, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

दोन एप्रिल २००५ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link