Next
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे पुरस्कारांचे वितरण
प्रेस रिलीज
Saturday, February 16, 2019 | 03:01 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत राज्यातील तंत्रनिकेतन संस्थांना सर्वोत्तम प्रयोगशाळा पुरस्काराने सन्मानित केले जाते. २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षांचे सर्वोत्तम प्रयोगशाळाचे पुरस्कार एकूण ११ संस्थांना घोषित झाले होते. त्याचे वितरण १५ फेब्रुवारी २०१९ रोजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते तंत्रनिकेतन संस्थांना करण्यात आले.

या प्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अद्ययावत अभ्यासक्रम तयार करणे व राबविणे त्याचप्रमाणे संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधा, यंत्रसामुग्री व मनुष्यबळ यांचा सदुपयोग व दर्जा उंचावण्यासाठी अनेक कार्यक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांतर्गत प्रयोगशाळांची गुणवत्ता सर्वोत्कृष्ट करण्यासाठी व त्यांचे प्रोत्साहन वाढविण्याच्या हेतूने सर्वोत्तम प्रयोगशाळा पुरस्कार २०१४-१५ पासून सुरू केले असून, रोख रुपये ५० हजार व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सर्वोत्तम प्रयोगशाळा पुरस्कार २०१५-१६ आणि २०१६-१७ पारितोषिकप्राप्त संस्था अशा : संजय घोडावत पॉलिटेक्निक (हातकणंगले, कोल्हापूर, २०१५-१६), संदीप फांउडेशन्स संदीप इस्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक, (नाशिक, २०१५-१६ व २०१६-१७), विद्या प्रसारक मंडळाचे पॉलिटेक्निक (ठाणे, २०१५-१६), संदीप पॉलिटेक्निक (नाशिक, २०१५-१६), सेंट झेवियर्स टेक्निकल इन्स्टिट्यूट (माहिम, मुंबई २०१५-१६), सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक (सोलापूर, २०१५-१६), शासकीय तंत्रनिकेतन (औरंगाबाद, २०१६-१७), श्रीमती सावित्रीबाई फुले पॉलिटेक्निक (पुणे, २०१६-१७), शासकीय तंत्रनिकेतन (नाशिक, २०१६-१७), भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (नवी मुंबई, २०१६-१७), ठाकूर पॉलिटेक्निक (कांदिवली (पू), मुंबई २०१६-१७).
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search