Next
‘आयटीएम’तर्फे ‘स्पार्कप्लग २०१९’ उत्साहात
प्रेस रिलीज
Thursday, June 06, 2019 | 03:39 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : आयटीएम इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन अँड मीडिया यांच्या वतीने ‘स्पार्कप्लग २०१९’ या वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात फॅशन डिझाइन, इंटिरियर डिझाइन, व्हिज्युअल कम्युनिकेशन, अॅनिमेशन आणि व्हीएफएक्स विषयातील विद्यार्थ्यांच्या अभिनव आणि सर्जनशील कल्पनांचे प्रदर्शन करण्यात आले. 

डिझाइन शोसाठी थीम म्हणजे डिझाइनर सामाजिकरित्या जबाबदार कसे असू शकतात. ते काय शिकले, तर समाजाला परत कसे देऊ शकतात याची विचारमिमांसा करण्यात आली. व्हिज्युअल कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांच्या संकलनातील काही मुख्य गोष्टी ‘दी सेक्स टॉक’ आणि ‘मॉडर्न महाभारत’ होत्या. ‘दी सेक्स टॉक’ हा एक कॉमिक ब्रोशर आहे, त्यामध्ये पालक आपल्या मुलांशी लैंगिक संबंधाविषयी संभाषण कसे सुरू करू शकतात या बद्दल माहिती आहे. आधुनिक महाभारत कावड पद्धतीद्वारे मांडण्यात आले जी एक प्राचीन गोष्ट सांगणाऱ्या पद्धतींपैकी एक आहे. 

फॅशन डिझाइनच्या विद्यार्थ्यांनी कांतसूगी, पेंडोरा बॉक्स, ब्युटी फ्लॉवर फिजलिस अल्केकेन्गी, ग्लास मोल्ड्सच्या जपानी कलांमधून प्रेरित केलेल्या नवीन संकल्पना विकसित केल्या. ‘प्रेस्टिगियो ग्लोरिया’ नामक आठवणीत रमणाऱ्या संग्रहांपैकी एक म्हणजे स्थलांतरित सिंधींची कथा दर्शविण्यात आली, ज्यांनी मर्यादित निराशा स्वीकारत आशा सोडली नाही.

या विषयी माहिती देताना आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पुतचा म्हणाले, ‘आयटीएम आयडीएम’च्या विद्यार्थ्यांनी डिझाइन केलेले सर्जनशील कलेक्शन प्रदर्शित करून डिझाइन उत्साहींना आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी, हातभार लावण्यासाठी दर वर्षी ‘स्पार्कप्लग’ आयोजित केले जाते. आमच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या रचनात्मक डिझाइन, कौशल्य, उत्कटता आणि सर्जनशीलतेबद्दल आम्हाला अत्यंत अभिमान आहे.’

‘आयटीएम आयडीएम’च्या संचालक प्रीती खोडे म्हणाल्या, ‘स्पार्कप्लग विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट इन्स्टॉलेशन, थीमशीट स्पर्धा आणि भव्य फॅशन शोसह त्यांची निर्मितीक्षमता वाढवण्यासाठी मदत करते. आमच्या तरुण उदयोन्मुख डिझाइनरांचा उत्साह, उर्जा आणि भावना पाहून मला खूप आनंद झाला आहे.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search