Next
‘आयुष्मान भारत’अंतर्गत १० हजार नोकऱ्यांची संधी
‘आयुष्मान मित्र’ म्हणून करता येणार काम
BOI
Monday, August 06, 2018 | 06:27 PM
15 1 0
Share this story


देशातील गरीब कुटुंबांना आरोग्यसुरक्षा देणे, हा मुख्य उद्देश ठेवून ‘आयुष्मान भारत’ या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केंद्र सरकारतर्फे करण्यात आली. आता या योजनेची अंमलबजावणी सुरू असून या राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा मिशनमुळे देशभरात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. यामध्ये संबंधित गरीब कुटुंबाला दर वर्षी पाच लाख रुपयांचे सुरक्षा कवच देण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करताना सरकारी रुग्णालये, तसेच खासगी रुग्णालयांमध्ये ‘आयुष्मान मित्र’ या पदांतर्गत भरती करण्यात येणार आहे. 

काय आहे आयुष्मान योजना? 
‘आयुष्मान योजना’ ही ‘मोदी केअर योजना’ म्हणूनही ओळखली जाते. देशातील १० कोटी गरीब कुटुंबांना आरोग्य सुरक्षा देणे हा मुख्य हेतू ठेवून या योजनेची आखणी करण्यात आली आहे. यात रुग्णांना ५० रुपयांचा आरोग्य विमा आणि पाच लाख रुपयांपर्यंतचे सुरक्षाकवच देण्यात येणार आहे. प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला सुरक्षा कवच देण्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारी, तसेच खासगी रुग्णालयांना योजनेशी जोडण्यात आले आहे. याअंतर्गत सर्व नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये रुग्णांची मदत करण्यासाठी आयुष्मान मित्रांची नेमणूक करण्यात येणार आहे. या पदांसाठी भरती करण्यासाठी कौशल्य विकास मंत्रालयाबरोबर एक करार करण्यात आला आहे. हे भरती करण्यात येणारे आयुष्मान मित्र रुग्णालय आणि रुग्ण यांच्यातील समन्वयकाची भूमिका बजावतील. नोंदणीकृत सर्व रुग्णालयांमध्ये यासाठी एक वेगळा डेस्क असेल. त्या ठिकाणी हे आयुष्मान मित्र रुग्णांच्या कागदपत्रांची तपासणी करतील. 

येत्या १५ ऑगस्टपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी राज्य आणि केंद्र अशा दोन्हींकडून अंमलबजावणीची यंत्रणा राबवली जाणार आहे. सर्वप्रथम छत्तीसगड राज्यात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असून, त्यानंतर इतर राज्यांमध्ये ही योजना लागू करण्यात येणार आहे. यासाठी एकूण एक लाख आयुष्मान मित्रांची नोंदणी केली जाणार असून, तूर्तास पहिल्या टप्प्यात त्यातील १० हजार पदे भरली जाणार आहेत.   
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link