Next
हुजपा महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी
नागेश शिंदे
Thursday, December 20, 2018 | 05:27 PM
15 0 0
Share this article:



हिमायतनगर : येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे (एनएसएस) २० डिसेंबर २०१८ रोजी कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

हुजपा महाविद्यालयात २० डिसेंबरला सकाळी मान्यवरांच्या हस्ते कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांसमोर मनोगत व्यक्त करताना प्राचार्या उज्वला सदावर्ते म्हणाल्या, ‘गाडगेबाबा हे दिवसभर हातामध्ये झाडू घेऊन गावाची स्वच्छता करायचे आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून समाजमन समृद्ध करायचे. त्यांच्या कीर्तनशैलीच्या माध्यमातून ते शिक्षणाचा प्रचार करत होते. त्यांनी समाजातून अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले.’   

या प्रसंगी विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यानंतर ‘एनएसएस’च्या विद्यार्थांनी हातात झाडू घेऊन महाविद्यालयाच्या परिसराची स्वच्छता करून संत गाडगेबाबा यांना अभिवादन केले. या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन ‘एनएसएस’चे विभाग प्रमुख प्रा. डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी केले. सहकार्यक्रम अधिकारी प्रा. महेश वाखरडकर यांनी आभार मानले. या वेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी -विद्यार्थिनीं या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search